आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचं ऐकत नव्हता 13 वर्षांचा मुलगा, करायचा मनमानी अन् बोलायचा खोटं, वठणीवर आणण्यासाठी आईने वापरली ही पद्धत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा स्टोरीज व्हायरल झाल्या आहेत, ज्या आपण जाणून घेणे गरजेचे आहे.)

 

स्पेशल डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक लेटर व्हायरल होत आहे. जे एका आईने आपल्या 13 वर्षांच्या मुलाला लिहिलेले आहे. या पत्रात त्या महिलेने आपल्या मुलाला शिस्त शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, असे न केल्यास त्याला त्या प्रत्येक गोष्टीचा किराया द्यावा लागेल, जी त्याला मोफत मिळत आहे. महिलेला हे पत्र लिहावे लागले कारण तिचा मुलगा स्वत:ला खूप मोठे समजू लागला होता. आणि तिचे बिलकुल ऐकत नव्हता. एवढेच काय, त्याने आपल्या आईला स्पष्ट म्हटले की, तू माझी मालकीन नाहीस, मी स्वत:चा खर्च स्वत: उचलू शकतो. यानंतर त्याला धडा शिकवण्यासाठी महिलेने त्याच्या नावे हे पत्र लिहिले आहे, जे ताबडतोब जगभरात व्हायरल झाले.

एस्टेलाने लिहिलेले पत्र...

 

प्रिय एरोन,

असे वाटतेय की तू फक्त 13 वर्षांचा आहेस हे तू विसरला आहेस. मीच तुझी पालक आहे. तू आता तसे ऐकणार नाहीस, त्यामुळे तुला स्वातंत्र्याचा अर्थ शिकवण्याची वेळ आली आहे. तू मला माझ्या तोंडावर म्हणालास की, तू आता स्वत: पैसे कमवायला लागला आहेस, मग आता हे चांगले होईल की, मी तुझ्याकडून त्या सर्व वस्तू परत घ्याव्यात, ज्या मी मागच्या काळात तुझ्यासाठी खरेदी केल्या होत्या.
जर आता तुला लॅम्प/लाइट बल्ब वा इंटरनेट वापरायचे असेल, तर यासाठी तुला आपल्या वाट्याचा खर्च द्यावा लागेल. जो खालील प्रकारे आहे:

भाडे - $430 (29,500 रु.)
वीज- $116 (7,900 रु.)
इंटरनेट- $21 (1,440 रु.)
जेवण- $150 (10,300 रु.)

याशिवाय आतापासून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तुला कचरा टाकावा लागेल, सोबतच या दिवशीची साफसफाई आणि व्हॅक्यूमचे कामही करावे लागेल. तुला दर आठवड्याला आपले बाथरूम स्वच्छ करावे लागेल, स्वत:चे जेवण तयार करावे लागेल आणि कपडेही धुवावे लागतील. जर तुला हे करता येत नसेल, तर मी ते सर्व करायला तयार आहे, पण यासाठी मी तुझ्याकडून $30 डॉलर मोलकरीण म्हणून घेईन.

जर तुला रूममेटऐवजी पुन्हा माझा मुलगा होणे पसंत असेल तर आपण या अटींवर बोलू शकतो.

खूप खूप प्रेम, 
तुझीच आई


सिंगल मदर आहे एस्टेला
- आपल्या 13 वर्षीय मुलाला शिस्त शिकवण्यासाठी हे पत्र लिहिणाऱ्या आईचे नाव एस्टेला हेविशम आहे. त्या कौटुंबिक हिंसेमुळे आपल्या पतीपासून वेगळ्या राहत सिंगल मदर बनून मुलाचा सांभाळ करत आहेत.
- एस्टेला आपला मुलगा एरोनच्या बेशिस्तपणामुळे खूप त्रस्त झाल्या होत्या. एरोन खोटेही बोलू लागला होता. तो यू-ट्यूब व्हिडिओ तयार करून काही पैसे कमावू लागला होता, यामुळे एकदा तो आपल्या आईला म्हणाला की, मी आता स्वत:चा खर्च भागवू शकतो. एस्टेला यांना एरोनचे असे वागणे बिलकुल मंजूर नव्हते, यामुळे मुलाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिले.

- या पत्राला एस्टेलाने सोशल मीडियावर शेअर करताच ते व्हायरल झाले. या पोस्टला काही तासांतच 85 हजारांहून जास्त लाइक्स मिळाले, सोबतच ते 1.5 लाखांहून जास्त जणांनी शेअरही केले.

 

पत्र लिहिण्याचा झाला हा परिणाम
- एस्टेलाच्या मते, हे पत्र वाचल्यानंतर एरोनने त्यांची माफी मागितली आणि सोबतच विचारले की, आपल्या रूमचे सामान परत घेण्यासाठी त्याला काय करावे लागेल? एस्टेला यांनी त्याच्या रूममधून बरेचसे सामान परत घेतले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, एस्टेलाने मुलाला लिहिलेले पत्र...   

 

 

बातम्या आणखी आहेत...