आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Library, Like The Art Gallery, In That A 9 Floor Building Built Reading Room In Reverse Pyramid shape

आर्ट गॅलरीसारखी लायब्ररी, 9 मजली इमारतीमध्ये बनवल्या उलट्या पिरॅमिडच्या आकारांच्या रीडिंग रूम्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : जर्मनीची ​स्टटगार्ट सिटी लायब्ररी एका क्यूबच्या आकारामध्ये बनलेली आहे. 40 मीटर लांबीच्या या 9 मजली इमारतीमध्ये उलट्या पिरॅमिडच्या आकाराचे रीडिंग हॉल आहेत. याच्या चारही खोल्यांमध्ये कित्येक हजार पुस्तके ठेवलेली आहेत. यू यंग यी यांनी डिजाइन केलेल्या या बिल्डिंगमध्ये मुलांसाठी लायब्ररी, म्यूझिक, कॅफे, पेंटिंग गॅलरी आणि अनेक स्टडी रूम आहेत. 2011 मध्ये सुरु झालेल्या या लायब्ररीमध्ये 11,500 मीटरचे  फ्लोअर स्पेस आहे. रीडिंग रूममध्ये सर्व बाजूने एक समान 45 मीटर एवढी लांबी आहे. हेच कारण आहे की, लायब्ररी एकांत, अध्ययनशील आणि आर्किटेक्चरची आवड असणाऱ्या लोकांसाठी बनवली गेली आहे.  


स्टटगार्ट सिटी लायब्ररी एक पब्लिक लायब्ररी आहे. याला केंद्रीय लायब्ररीचा दर्जा मिळाला आहे. या लायब्ररीला 2013 मध्ये राष्ट्रीय लायब्ररी सन्मानदेखील मिळाला आहे. लायब्ररीच्या आत प्रवेश करताच ही एखाद्या आधुनिक आर्ट गॅलरीप्रमाणे वाटते. याच्या उलट्या पिरॅमिडच्या आकाराचे रीडिंग रूम सर्वात जास्त पसंतीस उतरतात. 

प्रत्येक देशाच्या नागरिकासाठी खुली असते ही लायब्ररी... 
सार्वजनिक लायब्ररी जगातील प्रत्येक देशाच्या नागरिकासाठी खुली असते. याच्या चारही बाजूच्या भिंतींवर चार भाषांमध्ये सिल्वर कलरने लायब्ररीचे नाव लिहिले आहे. पश्चिमेकडील भिंतीवर इंग्रजीमध्ये, उत्तरेकडील भिंतीवर जर्मनमध्ये, पूर्वेकडील भिंतीवर कोरियन भाषेमध्ये आणि दक्षिणेकडील भिंतीवर अरबी भाषेमध्ये नाव लिहिले आहे.  

बातम्या आणखी आहेत...