आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील वृक्षताेडीवरून शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि माजी मिसेसमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना कमिशनखोर पार्टी : अमृता फडणवीस
  • कमिशन हे भाजपचे नवे धाेरण : प्रियंका चतुर्वेदी

​​​​​​मुंबई : 'मुंबईतील आरे भागातील वृक्षताेड थांबवण्यासाठी मेट्राे कारशेडला स्थगिती देणारी शिवसेना औरंगाबादेत एक हजार वृक्षतोडीस कशी तयार होते?' असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी रविवारी टि‌्वटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला. शिवसेना कमिशनखोर पार्टी असल्याचा आराेपही त्यांनी केला. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विटरद्वारे चाेख प्रत्युत्तर देत 'कदाचित झाडे तोडण्यासाठी कमिशन घेणे हे भाजपचे नवे धोरण असावे,' असा टाेला लगावला. 'वृक्षतोड ही तुमच्या सोयीनुसार केली जाते. तुम्हाला कमिशन मिळाले की तुम्ही वृक्षतोडीस राजी होता. हे अक्षम्य पाप आहे. ढोंगीपणा हा रोग आहे. गेट वेल सून शिवसेना...' असा टोला अमृता यांनी ट्विटरद्वारे लगावला हाेता. त्यानंतर प्रियंका यांनी या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

मॅम, लवकर बऱ्या व्हा : प्रियंका
 
अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी टि‌्वट केले. त्या म्हणतात, 'मॅम, साॅरी, तुम्हाला निराश करते आहे. कारण औरंगाबादच्या महापौरांनी यापूर्वीच हे स्पष्ट केले अाहे की, ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही झाड ताेडले जाणार नाही. बळजबरीने खोटे पण रेटून बोलणे हा सगळ्यात मोठा रोग आहे.

काय अाहे प्रकरण?

'दिव्य मराठी'ने फाेडली वृक्षताेडीविराेधात वाचा

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अाैरंगाबादच्या सिडकाेत प्रियदर्शिनी उद्यानातील एक हजार झाडे ताेडण्याचे नियाेजन शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महापालिकेने केले अाहे. 'दै. दिव्य मराठी'ने या वृक्षताेडीला वृत्तमालिकेच्या माध्यमातून जाेरदार विराेध केला. 'जर अारेला विराेध तर मग प्रियदर्शिनीत वृक्षताेड का?' असा प्रश्नही वारंवार मांडला. शहरवासीयांच्या तीव्र भावनाही 'दिव्य मराठी'ने मांडल्या