आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Look Into Harmful Effects Of Fire Crackers After Supreme Court Decision On Firecracker Ban

एका नागगोळीतून निघतो 462 सिगारेटांएवढा धूर, सर्वात घातक असते निळ्या रंगाची आतशबाजी; जाणून घ्या आरोग्यास किती घातक फटाके!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने दीवाळीच्या दिवशी दोनच तास फटाके फोडणे आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर निर्बंधाचा निर्णय नुकताच जारी केला. या निकालावरून लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती तयार झाली आहे. राजधानीतील पर्यावरण तज्ज्ञ आणि जागरूक लोक सुद्धा या निर्णयाच्या अंमलबजावणीवर गोंधळात सापडले आहेत. त्यांच्या मते, गतवर्षी दिवाळीत प्रतिबंधित राहिलेले फटाके वाजवण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत प्रदूषणाचे ढग तयार झाले होते. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिलेल्या निर्णयात ग्रीन फटाके आणि कमी प्रदूषण पसरवणारे फटाके प्रशासनाने राखून दिलेल्या जागेवर रात्री 8 ते 10 या वेळेत वाजवण्याची सूट दिली. अशात पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण समित्या याची अंमलबजावणी कशी करतील असा प्रश्न उपस्थित होतो. 

 

किती घातक आहे फटाके जाळणे?

> 462 सिगारेटमधून निघणाऱ्या धूर एका नागगोळीतून निघतो. तर एक अनार जाळल्यानंतर निघणाऱ्या धुराची तुलना आपण 34 सिगारेटच्या धुरामुळे  होणाऱ्या प्रदुषणाशी करू शकतो. 
> इंडिया स्पेंडच्या रिपोर्टनुसार, एक फुलझाड जाळल्यानंतर 74 सिगारेटच्या धुराइतके प्रदूषण होऊ शकते.

 

फटाक्यांचे कोणते रासायन शरीराला घातक आहे?

> सल्फर डायऑक्साइड- हा फुफ्फुसे आणि श्वासाचा आजार असलेल्या व्यक्तींवर परिणाम करतो.
> कॅडमिअम- हे रासायन जास्त प्रमाणात शरिरात गेल्यास किडनी आणि यकृताला नुकसान पोहचू शकते. नर्व सिस्टिमवर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होतो. 
> कॉपर- हा श्वसन प्रक्रियेसाठी घातक आहे.

> लेड- हा थेट नर्व सिस्टिमवर घातक परिणाम करतो.
> नायट्रेट- हे रासायन त्वचेला नुकसान करते, डोळ्यांत जळ-जळ होते.

> क्रोमिअम- हे रासायन त्वचेवर परिणाम करते आणि फुप्फुसांच्या कॅन्सरचे कारण बनते.

 

आजार

अस्थमा अटॅक येऊ शकतो. निमोनियाचे लक्षण वाढू शकतात, बुद्धीचा विकास खुंटू शकतो. फुप्फुसांशी संबंधित विकारांचा धोका उद्भवतो.

 

ध्वनी प्रदूषणावरही करडी नजर

सर्वसामान्य मनुष्य 60 डेसिबलपेक्षा अधिक ध्वनी ऐकू शकत नाही. त्यामुळेच या दिवाळीला 60 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके फोडण्यावर बंदी आहे. त्यातही लोकल मार्केटमध्ये मिळणारे जवळपास सर्वच फटाके 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे असतात.

 

काय आहे इको-फ्रेंडली फटाके-

इको-फ्रेंडली फटाक्यांपासून प्रदूषण किंवा दुर्घटना होत नाही.

 

Extra Fact...
फटाके तयार करण्यात चीन पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. 

 

कोण अंमलबजावणी करणार आणि कोण रोखणार?

"दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषित झाल्यानंतर देखील दोन तास फटाके फोडण्याची परवानगी देणे हे कुठपर्यंत योग्य आहे." असा जाब अॅडव्होकेट आणि पर्यावरण तज्ज्ञ अनिल सूद यांनी विचारला. सोबतच या निर्णयाची अंमलबजावणी कोण करणार आणि फोडलेला फटाका कोणता आहे हे कसे ओळखणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

 

सुप्रीम कोर्टाचा निर्णय कौतुकास्पद

दिवाळीला प्रदूषणाची समस्य अतिशय विकट बनते. विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवतात. गतवर्षी कोर्टाच्या निर्णयात आखून दिलेल्या निर्णयांचे उल्लंघन झाले होते. अशात लोकांनी प्रदूषणाच्या विरूद्ध काम करावे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. 
-सुनील दहिया, सीनिअर कंपेनर, ग्रीन पीस इंडिया


आदेशाचे  पालन करण्यासाठी स्थापित केली जाणार टीम
घातक फटाके विक्री आणि फोडण्याविरूद्ध सरकार करणार कार्यवाही. लोकांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे यावर लक्ष ठेवण्यासाठी टीम स्थापित करण्यात आली आहे.  
- इमरान हुसैन, पर्यावरण मंत्री


भाजप-आप यांनी लागू करावे आपत काळ
केंद्र सरकारने राज्यांत अजुनही धान जाळण्यावर बंदी लावलेली नाही. सरकार लोकांना पब्लिक ट्रांसपोर्ट देण्यास अपयशी ठरले आहे. दिल्लीत दररोज 25 जणांचा श्वास आणि फुप्फुसांच्या विकारांमुळे मृत्यू होतो. भाजप आणि आपने एकत्रित येऊन प्रदूषणाविरूद्ध काही उपाययोजना करण्याची गरज आहे.  
- शमिष्ठा मुखर्जी, काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...