आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांत खूप काही बदलले, पण रामलल्लाची पूजावस्त्रे जैसे थे; मुख्य पुजारी म्हणाले-मुश्किलीने खर्च भागतोय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ९ नोव्हेंबरला आला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, ८ मार्चला होतील ४ महिने

लखनऊ- गेल्या चार महिन्यांत अयोध्योत खूप काही बदलले आहे. उदाहरणार्थ श्रीरामलल्ला कधी, कुठे, किती मोठ्या जागेत विराजमान होणार इतकेच नाही तर भाविकांची संख्या व दान दुपटीने वाढले आहे. पण श्रीरामलल्लाची पूजा आणि प्रसादाच्या बजेटची स्थिती आहे तशी आहे. प्रसादामध्ये आता रोटी, सब्जी, खीर दाखवली जाते. पाैर्णिमा आणि अमावास्येला पुरी- भाजी, खीर आणि एकादशीला फलाहार आणि खीर दाखवली जाते.

श्रीरामलल्लाचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले १९९२ पासून आतापर्यंत एखादी संघटना, संस्था, एखादा संत यांनी श्रीरामलल्लाची पूजा, प्रसाद आणि वस्त्र याची कधी चिंता केली नाही. मंदिराच्या उभारणीपर्यंत श्रीरामलल्ला काचेच्या बुलेटप्रूफ तात्पुरत्या मंदिरात नेण्याची तयारी सुरू आहे. तोपर्यंत व्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा आहे. सत्येंद्र दास पुन्हा एकदा बिल पाठवून खर्चाची रक्कम मागवण्याची तयारी करत आहेत.

दरमहा ‌१.०२ लाखांचा खर्च, पण देणार कोण?

- दरमहा पुजाऱ्यांसह ४ मदतनीस, ४ सेवेकरींच्या वेतनावर ७२ हजार रु. खर्च होतात.

- श्रीरामलल्लाची रोजची पूजा, आरती, प्रसादावर १००० रु. खर्च होतो(मुख्य पुजारी दास म्हणाले, खर्चासाठी एक दोन दिवसात १.०२ लाखांचे बिल पाठवणार, पण ते कोणाला द्यायचे याचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत. 

श्रीरामलल्लाकडे २८ जोडी वस्त्र, जे पुरेसे नाहीत


श्रीरामलल्लाकडे २८ जोडी वस्त्र आहेत. पण ते पुरेसे नाहीत. दास म्हणाले, गेल्या वर्षी रामनवमीला ५५ हजार रु. खर्च झाले होते. बिल दिले तर ५२ हजारच मंजूर झाले. या वेळी रामनवमीला ६० हजार रु. खर्च होण्याची शक्यता आहे.