आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुंबईच्या दहिसर भागात 34 वर्षीय युवकाने पोलिस पकडतील या भीतीने स्वतः गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्नेचा हा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान युवकावर रुग्णालयात उपचार करून त्याला सोडून देण्यात आले आहे.
यामुळे केला आत्महत्येचा प्रयत्न
वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.एम मुजावर यांच्या मते, शेर बहादुर सिंह असे युवकाचे नाव असून तो मुळतः नेपाळचा रहिवासी आहे. बुधवारी संध्याकाळी पानाच्या दुकानावरील चाकू घेऊन भर रस्त्यात स्वतःचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. पोलिस शेर बहादुरला छेडछाडच्या प्रकरणात लवकरच अटक करणार आहे आणि त्याला फाशीची शिक्षा होणार आहे अशाप्रकारे त्याचे मित्र त्याला घाबरवत होते. यामुळे शेर बहादुर इतका घाबरला की त्याने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पानवाल्याने वाचवले प्राण
शेर बहादुरने गर्गाचार्य दुबे यांच्या पानाच्या दुकानातून चाकू उचलला होता. पानवाल्याने सांगितले की युवक पान घेण्याच्या बहाण्याने आला आणि काउंटरवर ठेवलेला चाकू उचलून भर रस्त्यात बसून स्वतःचा गळा कापत होता. पानवाल्याने आरडाओरडा करत आसपासच्या लोकांना गोळा केले. यामुळे सदरील युवकाचे प्राण वाचले.
युवकावर कोणताही गुन्हा दाखल नाही
पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान शेर बहादुर विरोधात एकाही पोलिस स्टेशनमध्ये कोणताच गुन्हा दाखल नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचे मित्र मुद्दामहून त्याला त्रास देत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.