आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Man Blamed A Police Inspector For Illegitimate Relationship With Her Wife In Darbhanga

पती कामावरून घरी येताच रोज संध्याकाळी गायब व्हायची पत्नी, रात्री खूप उशिरा परतायची, पतीने विचारताच दरवेळी सांगायची नवे बहाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरभंगा - बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात एका पोलिस इन्स्पेक्टरचे महिलेसोबत अवैध संबंध असल्याचे प्रकरण समोर आले आहे. जेव्हा वीरेंदर कामावरून घरी यायचा तेव्हा त्याची पत्नी घरातून गायब व्हायची. रात्री खूप उशिराने घरी परतायची. पतीने कारण विचारल्यावर दरवेळी काही ना काही बहाणा सांगायची. पण नंतर तर पत्नी दिवसाच नव्हे, तर रात्रीही न सांगता गायब राहू लागल्याने हद्दच झाली. पत्नीच्या बहाण्यांना कंटाळून वीरेंदरने आपल्या सासरवाडीकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळले की, ती आपल्या माहेरी जात नव्हती. यानंतर महिलेचा पती वीरेंदरने तिच्यावर पाळत ठेवणे सुरू केले. तेव्हा त्याला कळले की, ती रोज एका पोलिसाला भेटायला जाते. पत्नीला जाब विचारल्यावर ती हमरीतुमरीवर यायची आणि इन्स्पेक्टरला काही म्हटले तर तो वर्दीचा धाक दाखवून भीती घालायचा.

 

डीआयजींनी दिले चौकशीचे आदेश
वीरेंदरने सामाजिक स्तरावरही प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच फरक पडला नाही. यानंतर वीरेंदर दरभंगाचे डीआयजी बिनोद कुमार यांच्याकडे जाऊन धडकला. वीरेंदरने डीआयजींना इन्स्पेक्टर शिवमुनी प्रसाद आणि आपली पत्नी संजू देवीमधील अवैध संबंधांची कहाणी सांगितली. वीरेंदरच्या तक्रारीवरून दरभंगाच्या डीआयजींनी एसएसपींना चौकशी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

कोण खरे कोण खोटे?
गंभीर आरोपांनी घेरलेली वीरेंदरची पत्नी संजू देवीने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावत आपल्या पतीला चारित्र्यहीन असल्याचे सांगितले आहे. संजू देवीने आपलया पतीला मारहाण करून घराबाहेर काढल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे संजू देवीने पोलिस इन्स्पेक्टर शिवमुनी प्रसाद यांचा बचाव करत म्हटले, माझी गरिबी दाखवून त्यांनी माझी मदत केली, परंतु माझ्या पतीला संशय करण्याची सवय आहे. मी जेव्हाही कुणाशी बोलते तेव्हा माझे कुणाशीतरी अवैध संबंध असल्याचे म्हणून बदनामी करतात. आता मला स्वत:लाच या घरात राहायचे नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...