एकाच खोलीत राहणाऱ्या / एकाच खोलीत राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, स्वत:ही आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी ठेवून प्रियकर फरार

सोनालीचे दुसर्‍या तरुणाशी संबंध असल्याच्या संशयातून सोमेशने सोनालीचा गळा आवळून तिची हत्या केला.

दिव्य मराठी वेब टीम

Feb 26,2019 09:14:00 AM IST

पुणे - एकाच खोलीत राहत असलेल्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार झाल्याची घटना पुण्यातील नऱ्हे येथे सोमवारी घडली. घटनेनंतर आरोपी फरार आहे. त्याने चिठ्ठी लिहून ठेवत ‘स्वत:ही आता आत्महत्या करणार’ असल्याचे नमूद केले आहे.


सोनाली भिंगारदिवे असे मृत तरुणीचे नाव असून झील इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती, तर सोमेश घोडके असे प्रियकराचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही नऱ्हे येथे एकाच खोलीत राहत होते. सोमवारी कॉलेजजवळच्या एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा कुजलेल्या अवस्थेतील सोनालीचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले होते. मृतदेहाशेजारी मिळालेल्या चिठ्ठीत आरोपीने स्वत:ही आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सोनाली बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी ४ दिवसांपूर्वीच पोलिसांकडे केली होती. दरम्यान, दोघांत मतभेद झाल्यानंतर सोमेशने सोनाली हिची हत्या केल्याची चर्चा आहे.

X
COMMENT