Crime / दीर काढायाच वहिणीची छेड, पोलिसांत तक्रार दिल्यामुळे रागाच्या भरात काढला महिलेचा काटा

6 वर्षांपूर्वी दिली होती तक्रार, यामुळे घरात होत होते वाद
 

दिव्य मराठी वेब

Jun 18,2019 01:38:00 PM IST

मनीमाजरा - येथील न्यू इंदिरा कॉलनीत राहणाऱ्या महिलेचा तिच्याच दिराने खून केला. सोमवारी चार वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समजते आहे.

ललिताच्या कुटुंबात बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. ललिता आणि तिचा पती मोहिंदर यांच्यात नेहमीच भांडणं होत होती. ललिता आपल्या दोन मुलांसह दुसऱ्या मजल्यावर राहत होती. तर सासू-सासरे पहिल्या मजल्यावर आणि तिचा दीर तळ मजल्यावर राहतो. नेहमीप्रमाणेच सोमवारी देखील यांच्या वाद झाला. यानंतर दीराने ललितावर कात्रीने वार केले. ललिताने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता तिचा गळा आवळून हत्या केली.

पोलिसांनी गोळा केले पुरावे :
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या फॉरेंसिक टीमने घटनास्थळा पाहणी केली. दरम्यान त्यांनी अनेक सँपल गोळा केले. यामध्ये चटाई, महिलेची ओढणी इत्यादी सामान ताब्यात घेतले. पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल अशोक यांच्या तक्रारीवरून कलम 302 (हत्या करणे) आणि 34 अंतर्गत मुकेश, वडील सीताराम आणि आई संतरो देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

भावाविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे पती वेगळा राहायचा :
ललिताने 6 वर्षींपूर्वी दीर मुकेशच्या विरोधात मनीमाजरा पोलिस ठाण्यात छेडछाडीचा तक्रार दाखल केली होती. याचा सूड घेण्यासाठी तिची हत्या करण्यात आली असावी. पोलिसांचे म्हणणे आहे की, यांच्या नेहमीच कौटुंबिक वाद झालेला आहे. पोलिसांनी अनेक वेळा त्यांची तक्रार नोंदवून घेतली होती. या परिवारात नेहमीच वाद होत होता. महिलेने आपल्या दीराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आपल्या भावाविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे महिंदर आपल्या पत्नीपासून वेगळा पिंजौर येथे राहत होता. यामुळे संपूर्ण परिवाराचा ललितावर राग होता.

X
COMMENT