आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका व्यक्तीने उधार घेतलेले पैसे मागण्यासाठी आलेल्या इलेक्ट्रिशियनवर पाळलेला सिंह सोडला, केस दाखल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीने उधार घेतलेले पैसे मागण्यासाठी आलेल्या इलेक्ट्रिशियनच्या मागे पाळलेला सिंह सोडला आहे, सुमारे एका महिन्यापूर्वी घडली घटना. या घटनेचा खुलासा अशातच झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. झाले असे की, पीडित इलेक्ट्रिशियनने आधी याची तक्रार दाखल केली नव्हती. पण आता जेव्हा आरोपीने उपचाराचे पूर्ण पैसे दिले नाही तेव्हा पोलिसांमध्ये तक्रार दिली गेली.  

ही घटना पाकिस्तानच्या पंजाबमधील शहादरा भागातील आहे. आरोपी व्यक्ती एका धार्मिक ठिकाणी केअरटेकरचे काम करतो. बातमीनुसार, आरोपीने पीडित इलेक्ट्रिशियनकडून काही काम करून घेतले होते, पण नंतर पुन्हा पुन्हा म्हणूनही त्याला पैसे परत दिले नाही. जेव्हा पीडित आपले पैसे घेण्यासाठी आला तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने रागात आपला पाळलेला सिंह त्याच्यावर सोडला, ज्यामुळे तो जखमी झाला होता.

आरोपीने पीडित व्यक्तीची समजूत काढली...  
या घटनेनंतर आरोपीने पीडित व्यक्तीला पोलिसांत तक्रार करू नको असे सांगितले आणि भरपाई देण्याचे कबुल केले. मात्र जेव्हा महिन्याभरानंतरही पीडित व्यक्तीला पैसे नाही मिळाले तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सिंह सोडणे आणि उपचाराचा खर्च न देण्याच्या आरोपाखाली अटक केली गेली. मात्र पोलिसांनी याबद्दल काही नाही सांगितले की, आरोपीकडे सिंह पाळण्याचे लायसन्स होते की नाही. याचाही खुलासा झाला नाही की, घटनेनंतर सिंह आता कुठे आहे. 

बातम्या आणखी आहेत...