Home | National | Other State | A man made fraud DSP to complete his hobby

शौक पूर्ण करण्यासाठी बीटेक सोडून बनला तोतया डीएसपी; अनेक लोकांची केली फसवणूक

वृत्तसंस्था | Update - Apr 24, 2019, 11:40 AM IST

डेटा एंट्रीचे करत होता काम, पोलिसांनी केली अटक

  • A man made fraud DSP to complete his hobby
    हैदराबाद - हैदराबाद पोलिसांनी शौक पूर्ण करण्यासाठी तोतया डीएसपी झालेल्या तरुणास अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, एम. व्ही. रविचंद्र (२९) याने बी.टेक.चे शिक्षण अर्धवट सोडले आहे. तो डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात तक्रारी आल्याने त्यास अटक केली आहे. त्याच्याजवळ बनावट पोलिसांचा गणवेश, बनावट ओळखपत्र व इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. तो भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यातील रहिवासी आहे. तत्पूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये रविचंद्र याने एका व्यक्तीला आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटकही केली होती. परंतु दोन दिवसांनी त्याची सुटका करण्यात आली.

Trending