आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Man Married To Two Girls At The Same Time, Said, 'i Can't Break Anyone's Heart...' The Video Went Viral

एका व्यक्तीने दोन मुलींशी केले लग्न, म्हणाला, - 'कुणाचेच मन मोडू शकत नाही...' व्हिडीओ झाला व्हायरल 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : इंडोनेशियामध्ये के विचित्र प्रकरण समोर आले आहे. ज्याने प्रत्येकाला हैराण केले आहे. एका व्यक्तीने आपल्या दोन गर्लफ्रेंडसोबत लग्न केले, तेही एकाच मंडपात. कुराननुसार, एक मुस्लिम व्यक्ती चार लग्न करू शकतो. पण हा पुरुष दुसरे लग्न तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याची पहिली पत्नी दुसऱ्या पत्नीसाठी त्याला अनुमती देईल. इंडोनेशियाच्या कायद्यानुसार, जर व्यक्ती काळजी घेण्यास सक्षम असेल तर आणि त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत असेल तर त्याला दुसरे लग्न करता येते. या व्यक्तीने एकाच मंडपात दोन मुलींशी लग्न केले. लोकल मीडियासोबत बोलताना तो म्हणाला, 'मी दोघींपैकी एकीचेही मन मोडताना पाहू शकत नव्हतो. त्यामुळे मी दोघींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.' 

इंडोनेशियामध्ये एक परंपरा हुंडा देण्याचीही आहे. जिथे मुलीचे कुटुंबीय मुलाला हुंडा देतात. त्याच्या विरुद्ध येथे मुलाने मुलीच्या घरच्यांना हुंडा देऊन सांगितले की, तो मुलीची काळजी घेऊ शकतो. मुलाने दोन्ही मुलीच्या घरच्यांना 5-5 हजार रुपये दिले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हारला होत आहे. सोबतच लग्नच फोटोदेखील व्हायरल होत आहेत. 17 ऑगस्टला लग्नाचा व्हिडीओ आणि फोटोज शेअर केले गेले होते.