आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या वादातून लहान भावानेच केली आपल्या थोरल्या भाऊ-भावजयची हत्या; एवढेच करुन न थांबता मृतांवर केले तलवारीने वार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहटा- पटनामध्ये जमिनीच्या वादातून छोट्या भावाने त्याचा थोरला भाऊ आणि भावजयची हत्या केल्याची घटना घडली आहे. रामबाबू आणि शारदा देवी असे या दाम्पत्याचे नाव असुन रामलखन असे हल्लेखोराचे नाव आहे. रामलखन आणि रामबाबु यांच्यात जमिनीचा वाद असल्याने ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

 

शेतात काम करत असताना थोरल्या भाऊ-भावजयवर झाडल्या गोळ्या

पोलिसांनी सांगितल्यानुसार, रामबाबू आणि शारदा देवी त्यांच्या शेतात काम करत होते. त्यानंतर अचानक रामलखन काही लोकांसोबत तिथे आला आणि आपल्या थोरल्या भावाशी वाद घालू लागला. वाद सुरू असताना राग सहन न झाल्याने रामलखनने रामबाबूवर गोळी झाडली. त्यानंतर आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या शारदा देवीवरही त्याने गोळी झाडून तिची हत्या केली. एवढेच करुन हल्लेखोर थांबला नाहीतर त्याने तलवारीने मृतांवर सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाला.

 

पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुहेरी खूनाचा गुन्हा नोंदवून रामलखन आणि त्याच्या साथिदारांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...