आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवसांपासून ऐकायला होत होता त्रास, डोक आणि कानालाही होऊ लागल्या वेदना, तरीही दुर्लक्ष करत राहिला तो माणूस, सीटी स्कॅनमध्ये कळाला एक गंभीर आजार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : इंग्लंडमधील एक व्यक्तीला कॉटन बड्सने कान साफ केल्यामुळे एक भयानक इन्फेक्शन झाले. ज्यामुळे ती व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन पडली. दवाखान्यात नेल्यावर कळले कि त्याच्या कानात कापसाचा एक तुकडा फसला आहे ज्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये नेक्रोटाइजिंग ओटिटिस एक्सटर्ना नावाचे इन्फेक्शन झाले आहे. त्याला मागील पाच वर्षांपासून ऐकायला त्रास होता होता आणि डोक्यात आणि कानाला भयंकर वेदना व्हायच्या. त्याला परत ठीक होण्यासाठी 10 आठवडे लागले. डॉक्टर्सने सांगितले की, कापसाचा तुकडा कान साफ करताना आतमध्ये फसला होता. इंफेक्शन वाढकले असते तर त्याचा जीवही गेला असता. 

लोकांची नावे विसरत होता... 
- दवाखान्यात त्याचे सिटी स्कॅन केले गेले ज्यामध्ये त्याच्या डोक्यात लहान लहान फोड दिसले. 
- कान - नाकाचे स्पेशलिस्ट डॉक्टर अलेक्जेंडर चार्लटनने सांगितले, त्या व्यक्तीच्या कानात कापसाचा तुकडा फसल्यामुळे त्याला नेक्रोटाइजिंग ओटिटिस एक्सटर्ना इन्फेक्शन झाले होते. ज्यामुळे त्याला 5 वर्षांपासून उजव्या कानाला वेदना आणि ऐकायला त्रास होता होता. 
- त्या व्यक्तीने नंतर सांगितले की, मागील बऱ्याच काळापासून तो लोकांची नावेही विसरत होता. याव्यतिरिक्त त्याला काहीही मानसिक समस्या नव्हती. 
- छोट्याशा सर्जरीद्वारे कानातील कापसाचा तुकडा बाहेर काढला गेला गेला आणि घाणही साफ केली गेली.  
- त्याला नंतर एंटीबायोटिक औषधी दिली गेली. 6 दिवसांनंतर सिटी स्कॅनमध्ये कळाले की, डोक्यावरील फोड कमी झाले होते. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी जवळपास 10 आठवडे लागले. 

कापसाच्या बड्सचा वापर करू नये...  
- डॉक्टरने सांगितले, कान साफ करण्यासाठी बड्सचा वापर करू नये.  
- कानात बड्स टाकल्यामुळे कान आणि त्याच्या नलिकेला नुकसान होते आणि आधीची घाण अजूनच आतमध्ये ढकलली जाते.  
- कापसाचा तुकडा आतमध्ये फसल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते.  

कसे करावे आपले कान साफ...  
- आपले कान साफ करण्यासाठी Olive oil चा वापर आपण करू शकतो.  
- घाण साफ करण्यासाठी olive oil किंवा बादामाच्या तेलाचे दोन थेंब कानात टाकावे. 

बातम्या आणखी आहेत...