आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका बिल्डिंगवरून दुसर्‍या बिल्डिंगवर जंप करणारे तरुण कॅमेर्‍यात झाले कैद.. निघाले विदेशी नागरिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रभादेवी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या 'एसआरए'च्या इमारतीवर जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील तरुणांची ओळख पटली असून ते परदेशी नागरिक असल्याचे समजते. या प्रकरणी इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी स्टंटबाजी करणार्‍या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

 

काही तरुण एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही स्टंटबाजी आपल्या मोबाइल कॅमेर्‍यात शूट करुन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. काही क्षणात हा व्हिडिओ व्हायरल झाला.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पर्यटनासाठी आलेले हे तरुण इमारतीवर जीवघेणी स्टंटबाजी करत होते. परदेशात हा प्रकार 'रुफ टॉप जंप' म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा प्रकार करणे भारतात कायद्याने गुन्हा आहे. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना समज देऊन त्यांना मायदेशी रवाना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...