आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीत घर जमलेल्या व्यक्तीने लॉटरीमध्ये पत्नीचे आवडते नंबर्स निवडले, लागला 7 कोटींचा जॅकपॉट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या आगीत आपले परंपरागत घर गमावलेल्या व्यक्तीला लॉटरीमध्ये सुमारे 7 कोटी रुपयांचा (1 मिलियन डॉलर) जॅकपॉट लागला. क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या 38 वर्षांच्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली नाही. तो म्हणाला, ‘‘नशीब माझ्यावर मेहेरबान झाले आहे, जेव्हा मला आणि माझ्या कुटुंबीयायांना याची सर्वात जास्त गरज आहे. मागच्या महिन्यात जेव्हा माझे घर आगीची शिकार झाले, तेव्हा सर्वकाही जाळून खाक झाले.’’


व्यक्तीने सांगितले, लॉटरी खरेदी करताना माझ्या पत्नीचे आवडते नंबर्स लक्षात ठेऊन ते घेतले होते. लॉटरीमध्ये त्याने दोन नंबर घेतले होते, ते 9, 42, 24, 13, 22 आणि 11 होते, तर 26 आणि 1 याचे पूरक अंक होते. आता माझ्या आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे करेन. 

चार महिन्यांपासून लागली आहे आग... 


ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये 4 महिन्यांपासून आग लागलेली आहे. 2000 पेक्षा जास्त लोकांची घरे जळाली आहेत. हजारो लोक कॅम्पमध्ये आयुष्य काढत आहेत. आतापर्यंत आगीत जाळून 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. जंगलाच्या आगीत 100 कोटींपेक्षा जास्त पशु आणि पक्षांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...