आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकही खिळा न वापरता तयार होत आहे संगमरवरी मंदीर, स्वतः जैन मुनींनी तयार केला मंदीराचा नकाशा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिराची छत जुन्या डाट तंत्रज्ञानाने बनवली जात आहे

अंबाला - अंबाला सिटीमधील गीता नगरीत जैन मुनी विजय इंद्रदिन्न सूरीश्वर यांच्या स्मृतीपित्यर्थ एक अनोखे गोलाकार जैन मंदिर बनवले जात आहे. या मंदीराची खासियत म्हणजे हे संपूर्ण मंदीर संगमरवर दगडाने बनवण्यात येत आहे आणि त्यात एकाही खिळ्याचा वापर झालेला नाहीये. मंदीराच्या छतासाठी भारतीय शिक्ल कला 'डाट'चा वापर करण्यात आला आहे.

मंदीराचे काम 2011 मध्ये सुरू झाले


मंदिराचे काम मुनी सुरिश्वर यांचे शिष्य मुनी विजय रत्नाकर सूरीश्वर यांनी 2011 मध्ये सुरू केले. मंदीराचा नक्षा कोण्या आर्किटेक्टने नाही, तर स्वतः जैन मुनी विजय रत्नाकर सूरीश्वर यांनी तयार केला आहे. आर्किटेक्टने मंदीरात 36 घुमट बसवता येणार नाही असे म्हटले होते, पण जस-जसे घुमट बसवण्यात आले, ते पूर्ण झाले. जैन स्थापत्य कलेच्या या मंदीरात वापरण्यात येत असलेले मार्बल राजस्थानच्या मकरानामध्ये तयार होत आहेत. याला अंबालामध्ये आणुन एकमेकांसोबत जोडले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...