आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई/नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या अधिपत्याखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी इतिहास रचला. कंपनी १० लाख काेटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नाेंद करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. पेट्राेलपासून ते दूरसंचारपर्यंतचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचे बाजार भांडवल गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर १०,०१, ५५५.४२ काेटी रुपये (१३९.८ अब्ज डाॅलर) झाले. गुरुवारी सकाळी १०.२५ वाजता कंपनीने हा गाैरवास्पद क्षण अनुभवला. त्या वेळी मुंबई शेअर बाजारात कंपनीने १०,००,६०४.५५ काेटी रुपयांच्या बाजार भांडवलांची नाेंद केली. विशेष बाब म्हणजे या वर्षी कंपनीच्या शेअरच्या किमतीत जवळपास ४१ टक्के वाढ झाली अाहे, तर सेन्सेक्समध्ये याच कालावधीत केवळ १४ टक्के वाढ झाली.
कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारी ०.६५ टक्क्यांनी वाढून १,५७९.९५ रुपयांवर बंद झाली. दिवसभराच्या व्यवहारात ती ०.९० टक्क्यांनी वाढून १,५८४ रुपयांवर गेले. कंपनीच्या शेअरची ही अातापर्यंतची सर्वाधिक किंमत अाहे. गेल्याच अाठवड्यात कंपनीने ९.५ लाख काेटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला हाेता. १८ अाॅक्टाेबरला ९ लाख काेटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नाेंद केली. कंपनीने अशा प्रकारे केवळ २७ साैद्यांच्या सत्रात अापल्या बाजार भांडवलात एक लाख काेटी रुपयांच्या वाढीची नाेंद करत हे यश संपादन केले अाहे. रिलायन्सच्या शेअर किमतीतील उसळीमुळे गेल्या १५ अाठवड्यांत मुकेश अंबानी अाणि त्यांच्या कुटुंबाच्या समभाग मूल्यात ४५ टक्के वाढ झाली अाहे. रॅलिगेअर ब्राेकिंगचे संशाेधन उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, अंबानी यांच्या कंपनीने गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम अाणि रिटेलसारख्या ग्राहकांशी निगडित क्षेत्रात गुंतवणूक केली अाहे. या गुंतवणुकीच्या बळावर कंपनीने चांगली कामगिरी केली.
हे दाेन निर्णय ठरले झेप घेण्याचे कारण
- रिलायन्स जिअाेचा टेलिकाॅम क्षेत्रावरचा प्रभाव अमराकाे या साैदी अरब कंपनीला हिस्सा विक्री (इपिक रिसर्च)
- दुसरीकडे मुकेश अंबानी हे गुरुवारीच ५ लाख काेटी रुपयांच्या (७० अब्ज डाॅलर) संपत्तीचा टप्पा अाेलांडणारे पहिले भारतीय ठरले अाहेत.
- बाजार भांडवल ७,७९,५०१.६४ काेटी रुपये झाले. एचडीएफसी ही तिसरी माैल्यवान कंपनी ठरली असून तिचे बाजार भांडवल ६,९२,८५३.४८ काेटींवर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.