आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिसबेन - ४० वर्षांपूर्वी लग्नातील अंगठी हरवलेल्या मायकल हिल यांना अखेर आपली अंगठी सापडली आहे. घरासमोरील बागेत त्यांची अंगठी हरवली होती. ही अंगठी शोधून देण्यात त्यांच्या एका परिचयातील प्लंबरने मदत केली. जुन्या वस्तूंचा शोध लावण्याची आवड असलेल्या जुआल बटलर यांनी मेटल डिटेक्टरने अंगठी शोधून दिली. मायकलने ही अंगठी शोधून देणे खूप महत्वाचे ठरले. कारण ७२ वर्षीय मायकल पत्नी काएसोबत लग्नाचा ५० वा वाढदिवस पुढील महिन्यात साजरा करत आहेत. मायकल यांनी ती अंगठी सापडण्याची अपेक्षा सोडली होती. मात्र त्यांनी मुलास लग्नात घातलेली अंगठी हरवल्याची खंत बोलून दाखवली होती. मुलाने फेसबुकवरून प्लंबर जुआलचा पत्ता शोधला होता.
अंगठी सापडल्यानंतर म्हणाले, आता अंगठी पत्नीच्या एका बॉक्समध्ये जपून ठेवली आहे
मायकल यांची अंगठी बागकाम करताना हरवली होती. जुआल गेल्या आठवड्यात अंगठी शोधून देण्यासाठी घरी आला होता. ११ तास सगळी बाग मेटल डिटेक्टरने धंुडाळून काढली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. पुन्हा रविवारी तो आला. त्याने घरातील उजव्या बाजूस बागेच्या पट्टीत डिटेक्टरने पुन्हा प्रयत्न सुरू केला. याच ठिकाणी अंगठी दबलेली होती. जुआल यांनी जमिन खोदण्यास सुरूवात केली. आठ इंच खोदकाम झाले असताना अंगठी त्याच्या हाती लागली. अंगठी सापडल्यानंतर मायकल यांची प्रतिक्रिया खूप भावूक होती. ते म्हणाले, हा क्षण खरोखरच माझ्यासाठी खूप भावपूर्ण असा आहे. इतक्या वर्षांत न जाणो हजारो वेळा बागेत त्या ठिकाणी मी गेलो असेल. त्या अंगठीवर पाय ठेवला असेल. पण अंगठी त्या जागी असेल याची जराही कल्पना नव्हती.
माझी अंगठी शोधणे खूप जरुरी होते. हे मुलेही जाणून होते. त्यामुळेच त्यांनी जुआलच्या मदतीने अंगठी मला परत मिळवून दिली. आता ही अंगठी माझ्या बोटाला बसत नाही. त्यामुळे तिला पत्नीच्या अंगठीच्या बॉक्समध्ये जपून ठेवली आहे. आता ती हरवणार नाही. काएच्या अंगठीसोबत माझी अंगठी असेल. जसा मी व काए गेल्या ४९ वर्षांपासून सोबत एकत्र राहात आहोत, असे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.