आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये चढताना अल्पवयीन मुलीने चोरले मंगळसूत्र; तिला चोरी करायला लावली असल्याचा पोलिसांना संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दोन मंगळसूत्र अल्पवयीन मुलीने चोरले. ही घटना नवीन बसस्थानकात गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता घडली. हरिओमनगरातील साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या शारदा धनेश्वर कोळी (वय ३६) ही महिला गुरुवारी नवीन बसस्थानकातून पाचोरा बसमध्ये चढू लागल्या. या वेळी दहा वर्षांची गुलाबी रंगाचे स्वेटर व चॉकलेटी पॅन्ट घातलेली मुलगी गर्दीतून वाट काढत आली. तिने कोळी यांच्या गळ्यातील १० हजार किमतीचे दोन मंगळसूत्र चोरून पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली. प्रवाशांसह बसस्थानकात नेमणुकीस असलेले पोलिस घटनास्थळी आले.

 

पोलिसांनी बसस्थानक परिसरात शोध घेतला. तोपर्यंत ती मुलगी पळून गेली होती. त्या मुलीसोबत तिचे साथीदार असावे. त्यांनीच तिला चोरी करायला लावली असल्याबाबत पोलिसांना संशय आहे. बसस्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोलिस गेले; परंतु सीसीटीव्ही हाताळणारा नसल्याने फुटेज तपासले नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...