आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्याच्या चिमुकलीला टोलनाक्यावर सोडून निर्दयी मातेचा पोबारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोलनाक्याजवळ आईने सोडून दिलेल्या या चिमुकलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत - Divya Marathi
टोलनाक्याजवळ आईने सोडून दिलेल्या या चिमुकलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

बीड - दीड महिन्याच्या मुलीला गेवराई तालुक्यातील टोलनाक्याजवळ सोडून देत मातेने पोबारा केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ग्रामस्थांनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.


जिल्ह्यात मागील काही दिवसांत नवजात अर्भक टाकून देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गत यापूर्वीच अशा गुन्ह्यांचा तपास नसताना मंगळवारी पहाटे आणखी एक घटना घडली. गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळील टोलनाका परिसरात एका बाळाचा रडण्याचा आवाज याच भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कानी पडला. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. या वेळी त्यांना एक मुलीला टॉवेलमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला टाकलेले दिसले. हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. त्यांनी चिमुकलीला घेऊन पहाटे ५ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. मोहिनी जाधव व त्यांच्या टीमने या मुलीवर तत्काळ उपचार केले. सध्या या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे.