आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू पत्नीच्या श्राद्धासाठी मुस्लिम पतीची लढाई, सोशल मीडियावर व्हायरल झाली रहमान अन् निवेदिताची LOVE STORY

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क, नवी दिल्ली - एका मुस्लिम पतीला आपल्या हिंदू पत्नीचे श्राद्ध कर्म करण्याची इच्छा आहे, यासाठी आधी मंदिर प्रशासन तयार झाले होते. रजिस्ट्रेशन केले होते. पैसे जमा करण्याची तारीख ठरवली, परंतु जेव्हा पतीचे नाव जाणून घेतले, तेव्हा श्राद्ध कर्म करायला नकार दिला. मंदिर प्रशासनानचे म्हणणे आहे की, ते हिंदू धर्माच्या नियमांना बदलू शकत नाहीत. परंतु आम्ही प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करू.

    
कपलची Love Story : 
निवेदिता घटक. धर्माने हिंदू होत्या. त्यांनी कलकत्ता युनिवर्सिटीतून बंगालीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले होते. त्याच युनिव्हर्सिटीतील इम्तियाजुर रहमान नावाचा तरुण शिकत होता. धर्माने मुस्लिम. फारसीचे शिक्षण घेत होता. युनिव्हर्सिटीतच दोघांची भेट झाली आणि काही दिवसांतच त्यांच्यात प्रेम झाले. धर्माच्या पलीकडे जाऊन त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मग आपले स्वत:चे धर्म न सोडता दोघांनी 1998 मध्ये लग्न केले.

 

20 वर्षे दिली एकमेकांची साथ : 
लग्नानंतर निवेदिता आणि रहमान दिल्लीत राहायला लागले, परंतु त्यांची सोबत जास्त दिवस नाही राहिली. काही दिवसांपूर्वीच निवेदिता यांचे निधन झाले. डॉक्टर्स म्हणायचे की, त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते, याला मल्टी ऑर्गन फेल्यूअर म्हटले जाते. रहमान यांनी निवेदिता यांचे निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार पार पाडले.

 

पतीला करायचे आहे श्राद्ध कर्म : 
रहमान यांना पत्नी निवेदिता यांचे श्राद्ध कर्म करण्याची इच्छा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहमान यांनी 6 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या चितरंजन पार्क काली मंदिरात श्राद्ध कर्मासाठी बुकिंग केली. 1300 रुपयेही दिले. श्राद्ध कर्मासाठी 12 ऑगस्टची तारीख देण्यात आली. परंतु बुकिंगच्या काही वेळानंतरच त्यांना एक फोन आला आणि श्राद्धासाठी नकार देण्यात आला. रहमान म्हणाले की, माझी पत्नी हिंदू धर्माचे पालन करायची. मला ते सर्व करण्याची इच्छा आहे, जी तिची इच्छा होती.


फोनवर अनेक वेळा नाव विचारण्यात आले : 
रहमान म्हणाले, फोन करणाऱ्या व्यक्तीने अनेक वेळा त्यांचे नाव विचारले. दरवेळी त्यांनी आपले नाव रहमान सांगितले. यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्यांच्या पत्नीचे श्राद्ध कर्म होऊ शकत नाही. रहमान यांच्या मते, कारण विचारल्यावर त्या व्यक्तीने बांग्ला भाषेत सांगितले की, आपनी बुझे नी (तुम्हाला चांगलेच समजत असेल). तो म्हणाला की, तुम्ही जे पैसे जमा केले आहेत, ते परत घेऊन जा.

 
- काली मंदिर सोसायटीचे अध्यक्ष अस्तित्व भौमिक म्हणाले की, हिंदू धर्माच्या नियमांना बदलता येत नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी नक्कीच करू.   

 

बातम्या आणखी आहेत...