आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विहिरीतून नेहमी यायचा एक रहस्यमयी प्रकाश, आजपर्यंत उकलले नाही गुढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात आजही अनेक रहस्यमयी ठिकाण आहेत, जे लोकांसाठी अजूनही रहस्य बनलेले आहे. असेच एक ठिकाण पुर्तगालच्या सिन्तारामध्ये आहे. येथे एक रहस्यमयी विहिर आहे. यामध्ये नेहमी एक रहस्यमयी प्रकाश येतो. हा प्रकाश कशाचा आहे, याचा शोध अजूनही वैज्ञानिक लावू शकलेले नाहीत. 


या विहिरीला 'विशिंग वेल'ही म्हणतात. ही विहीर लोकांच्या सर्व इच्छा पुर्ण करते असे मानले जाते. यामुळेच लोक या विहिरीत नाणे टाकून इच्छा व्यक्त करतात. त्यांची इच्छा अवश्य पुर्ण होणार हे त्यांना माहिती असते.

 

सामान्यतः विहीर ही पाण्यासाठी खोदली जाते. पण ही विहीर जगातील अनोखी विहीर आहे, याची स्थापना धार्मिक दीक्षा संस्कारांसाठी करण्यात आली होती. पण या स्थापनेचा प्रामाणिक उद्देश आजपर्यंत समजलेला नाही.

 

या विहिरीचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे, यामधून एक प्रकाश येतो. असे सामान्यतः शक्य नाही, कारण या विहिरीत प्रकाशाची काहीच व्यवस्था नाही. मोठे मोठे विद्वान आणि वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उलगडलेले नाही. 

 

ही विहीर चार मजली इमारती एवढी खोल आहे असे बोलले जाते. असेही म्हटले जाते की, या विहिरीत आपण जमीनीमध्ये जेवढे खोल जाण्याचा प्रयत्न केला, विहीर तेवढी खोल होत जाते. याच सर्व कारणांमुळे ही विहीर एक रहस्य बनली आहे. 

बातम्या आणखी आहेत...