आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पोलिसाला विदेशी महिलेशी संबंध प्रस्थापित करायचे होते, त्यानेच आम्हाला अडकवले', ए. नंबी नारायणन यांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

३० नोव्हेंबर १९९४, माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस. पोलिसांनी मला अटक केली आणि पुढील ५० दिवस पोलिस कोठडीत गेले. ते मला मारत असत. बसण्यासाठी खुर्चीही देत नसत. पाणी मागितले की चेहऱ्यावर एक-एक थेंब टाकत असत. फक्त ते मला जिवानिशी मारू शकत नव्हते, कारण पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूसाठी कोर्टात उत्तर द्यावे लागेल हे त्यांना माहीत होते. पाकिस्तानचा हेर असल्याचे मी स्वीकारावे यासाठी त्यांचा माझ्यावर दबाव होता. अनेकदा धीर सुटला आणि आत्महत्या करावी, असे वाटले. पण कुटुंबामुळे जिवंत राहिलो आणि निर्दोष सुटका होऊ शकली.

 

ही कथा एका सर्कल इन्स्पेक्टरपासून सुरू झाली. इस्रोच्या हेरगिरी प्रकरणाच्या काही दिवस आधी हा इन्स्पेक्टर केरळच्या एका हॉटेलमध्ये नियमित तपासणीसाठी गेला होता. त्याच हॉटेलमध्ये त्याला मरियम राशिदा ही मालदीवची महिला नागरिक भेटली. त्याने मरियमवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला. मरियम कशी तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरली आणि तिने इन्स्पेक्टरच्या विरोधात केस करायला सांगितले. मात्र, इन्स्पेक्टरने उलट तिलाच फसवण्याची योजना बनवली. तिने महिलेचा पासपोर्ट, तिकीट आणि आवश्यक साहित्य घेतले. तोपर्यंत ती भारतात जास्त थांबली नव्हती. ही महिला विदेशी आहे; त्यामुळे तिला अटक करायची असेल तर ओव्हरस्टेइंगची केस बनवावी लागेल, हे इन्स्पेक्टरला माहीत होते. मरियमने आपली कागदपत्रे परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तिला यश मिळाले नाही. तेव्हा तिने आपले तिकीट रद्द केले. त्यामुळे तिला अटक करण्याचे कारण सर्कल इन्स्पेक्टरला मिळाले. पोलिसांनी मरियमची डायरी तपासली तेव्हा ती 'ग्लॅव्हकॉसमॉस' या रशियन अंतराळ संस्थेचे भारतीय प्रतिनिधी चंद्रशेखरन यांच्याही संपर्कात असल्याचे समजले. याच प्रकरणात पोलिसांनी मालदीवची दुसरी महिला फौजिया हसनलाही अटक केली. वस्तुस्थिती अशी होती की, मरियम गाइड म्हणून आणि फौजिया उपचारांसाठी भारतात आली होती. फौजियाच्या मुलीला भारतात शिक्षणही घ्यायचे होते. या दोन्ही महिलांची चंद्रशेखर यांची भेट विमानतळावर झाली होती. त्यांचे १०० डॉलर हरवले होते, ते चंद्रशेखरन यांनी परत मिळवून दिले होते. मुलीच्या प्रवेशासाठी फौजिया चंद्रशेखरन यांच्याकडेच आली होती.

 

इस्रोचे वैज्ञानिक शशीकुमार यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे हे लोक शशीकुमार यांच्या संपर्कात आले. त्यांना शशीकुमार यांच्या पत्नीच्या मदतीने एक चांगला कार्डिओलॉजिस्ट हवा होता. मला तोपर्यंत या दोन महिलांबद्दल काहीच माहीत नव्हते. केस सुरू झाल्यानंतरच मला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. फौजियाच्या मुलीच्या प्रवेशासाठी या लोकांनी बंगळुरूचे कंत्राटदार एस. के. शर्मा यांची मदत घेतली. अशा प्रकारे या कथेत आणखी एक पात्र वाढले. अर्थात हे जे काही सुरू होते ते मानवीय मदत करण्याच्या हेतूने होते. आश्चर्याची बाब म्हणजे मी या दोन महिला, शर्मा आणि चंद्रशेखरन यांच्यापैकी कोणालाही ओळखत नव्हतो. शशीकुमार माझ्यासोबत काम करत होते, पण त्यांच्याशी माझी मैत्री नव्हती. पोलिसांनी केस जास्त मजबूत करण्यासाठी या महिलांचा चंद्रशेखरन आणि शशीकुमार यांच्याशी फोनवर झालेल्या संवादाचा आधार घेतला आणि केसचा संबंध इस्रोशी जोडला. यात यश मिळाले तर आपल्याला हीरो मानले जाईल, असे सर्कल इन्स्पेक्टरला वाटत होते. ही लढाई एवढी मोठी होती की, मला न्याय मिळण्यासाठी २५ वर्षे लागली.

 

केसनंतर जेव्हा मी पहिल्यांदा तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा माझी त्यातून निर्दोष मुक्तता होईल, अशी मला मुळीचे अपेक्षा नव्हती, पण मला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास होता. सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनीही या केसचा तपास प्रामाणिकपणे केला आणि मला न्याय मिळाला. एकदा तर आत्महत्या करावी, असा विचार माझ्या मनात आला होता. मी वकिलाच्या मदतीने वारसपत्र तयार केले होते. पण वकिलामार्फत हे माझ्या घरी कळले. मुलांनी मला समजावून सांगितले की, जर तुम्हाला काही झाले तर संपूर्ण जग तुम्हाला हेर मानत राहील, पण जर तुम्ही लढाई लढलात तर तुम्ही निश्चित विजयी व्हाल. खटल्यासाठी मी १९ वेळा दिल्लीला गेलो. प्रत्येक वेळी मला सुमारे १.५ लाख रुपये खर्च करावे लागत होते. पण मी निर्दोष आहे हे मला सिद्ध करायचेच होते. 

बातम्या आणखी आहेत...