आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशी घुसखोरांविरोधात देशभर अभियान; ५१ लाख हिंदूंना विहिंपशी जोडणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सुरुंग लागला आहे. याविरोधात हिंदू जागृती करून लढा उभारण्यासाठी १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत देशव्यापी जनजागरण अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. 
१७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर यादरम्यान देशात ५१ लाख हिंदूंना जोडणार आहोत. त्यात विदर्भ प्रांतातील २ लाख हिंदूंना विहिंपचे सदस्यत्व देण्यात येणार असल्याचे परांडे यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे ३२ लाख लोकांना जोडण्यात आले आहे. १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान गुरुनानक जयंती प्रकाशोत्सवानिमित्त देशभरात कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा हैदाेस वाढला असून दोन दिवसांपूर्वी हिंदू जोडप्याची हत्या करण्यात आली. आतापर्यंत तिथे ७१ जणांची हत्या करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सरकारने आणलेल्या एनआरसी कायद्यामुळे घुसखोरांवर अंकुश लागणार आहे. पण या कायद्यांतर्गत देशात परत येऊ पाहणाऱ्या हिंदूंना मात्र एनआरसी कायदा न लावता शरणार्थी म्हणून प्रवेश देऊन सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी परांडे यांनी केली. हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी एनआरसी कायद्याची कठोर अंमलबजावणी आधी आवश्यक आहे. देशातील  मुसलमान घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना देशाबाहेर काढण्यात यावे. यासाठी आम्ही गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिले आहे, असेही परांडे या वेळी बोलताना सांगितले.
 

आंध्रमध्ये खिरापती वाटप
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी हे हिंदूद्वेष्टे असून हिंदू मंदिराच्या जमिनी मौलवी तसेच ख्रिस्ती धर्मगुरूंना घरे बांधण्यासाठी देत आहेत. याला आमचा तीव्र विरोध आहे. ख्रिस्ती मिशनरींजवळ आधीच चर्चच्या शेकडो एकर जमिनी आहेत. त्या त्यांना देण्यात याव्या. तसेच हिंदू मंदिरांच्या जमिनी वंचित वर्गाला देण्यात येत आहेत. 

जनतेच्या करातून गोळा झालेल्या पैशातून मौलवी तसेच ख्रिस्ती धर्मगुरूंना मासिक मानधन देण्याची योजना आहे. याला आमचा तीव्र विरोध असून यासंदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या धार्मिक संस्थांनी मानधन द्यावे. पण जनतेच्या पैशातून कदापि मानधन देऊ नये, असे परांडे यांनी या वेळी बोलताना पत्रकारांशी सांगितले.
 

न्यायालयाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने लागेल
लव्ह जिहादच्या नावाखाली ख्रिस्ती मुलींचेही धर्मांतरण करण्यात येत आहे. केरळमधील चार हजार मुलींचे इस्लामीकरण करण्यात आल्याची माहिती जाॅन कुरियन नावाच्या एका ख्रिश्चन नेत्याने दिली. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात यावे. या प्रकरणाला आळा घालण्यासाठी विहिंप प्रयत्न करणार असल्याचे परांडे यांनी सांगितले. हिंदू मंदिरांना दानदात्यांनी दिलेल्या जमिनी मंदिरांची देखभाल व िवकास कार्यासाठीच वापरण्यात याव्या, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राममंदिराच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.