आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात लवकरच नवीन सरकारची स्थापना, केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मदत मागितली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्राकडे अधिकाधिक अर्थसहाय्याचे आवाहन या भेटीमध्ये केल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. परंतु, महाराष्ट्रात सरकार स्थापनेला होणाऱ्या विलंब आणि तिढ्यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

फडणवीस यांनी नॉर्थ ब्लॉकमध्ये अमित शहांची भेट घेतली. तसेच त्यांना एक निवेदन दिले. या बैठकीमध्ये त्यांनी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित करताना शिवसेनेकडून होणारा दबाव आणि रस्सीखेच यावर अमित शहांसोबत चर्चा केली असे सांगितले जात आहे. परंतु, भेटीनंतर त्यांनी पत्रकारांवर यावर काहीही बोलण्यास नकार दिला. यावेळी नवीन सरकार स्थापनेबद्दल आपण काहीही बोलू इच्छित नाही. लवकरच नवीन सरकार येईल केवळ एवढेच बोलू शकतो असे बोलताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले.

बातम्या आणखी आहेत...