आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये चमकले चित्रपटातील कलाकार, प्रभासच्या 'बाहुबली'ने बनवला नवा रेकॉर्ड   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : चित्रपट 'बाहुबली : द बिगनिंग' आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. शनिवारी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये चित्रपटाचे एक स्पेशल स्क्रीनिंग केले गेले. या चित्रपटाला ऑडियंसने स्टँडिंग ओवेशन दिले. बाहुबलीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ आणि काही फोटोज शेअर केले गेले आहेत. बाहुबलीने आपल्या ट्विटरवर सांगितले की, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच इतरभाषेतील चित्रपट आहे. यामध्ये लिहिले गेले आहे, ‘बाहुबली : द बिगनिंग एकमेव असा इतर भाषेतील चित्रपट आहे, जो 148 वर्षांपूर्वी झालेल्या उदघाटनानंतर रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दाखवला गेला.' 

हा चित्रपट पाहताना चित्रपटगृह गच्च भरलेले होते. शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले गेले आहे की, ‘रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये स्टँडिंग ओवेशन. जे कुणी या चित्रपटाच्या लॉन्चवर आले, त्याने चित्रपटाचे खूप कौतुक केले. थॅक्यू लंडन. बाहुबलीची संपूर्ण टीम ही आठवण नेहमी आपल्या मनात ठेवेल.’ स्क्रीनिंग सुरु होण्यापूर्वी राणा दग्गुबाती, प्रभास, अनुष्का शेट्टी यांचे भव्य स्वागत केले गेले. यावेळी बाहुबलीची संपूर्ण टीम आणि प्रेक्षकही चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...