• Home
  • A Norwegian womans running and jumping like a horse

International Special / घोड्याप्रमाणे हात आणि पायांवर धावते ही महिला, लोकांनी दिले 'हॉर्स वूमन' नाव

आयला फक्त वेगाने चालतच नाही, तर घोड्याप्रमाणे एखाद्या अडचणीतून उडीसुद्धा मारू शकते

दिव्य मराठी वेब टीम

May 21,2019 05:23:38 PM IST

नार्वे(यूरोप)- एखादा मनुष्य घोड्याप्रमाणे धावू शकतो असे ऐकल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल. पण नार्वेमध्ये राहणारी आयला कर्स्टन घोड्याप्रमाणे चालत असल्यामुळे सध्या चर्चेत आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केले जात आहेत. आयला फक्त वेगाने चालतच नाही, तर घोड्याप्रमाणे एखाद्या अडचणीतून उडीसुद्धा मारू शकते.

कर्स्टन तीन आठवड्यापुर्वीच इंस्टाग्रामवर अकाउंट उघडले होते. पण तिच्या या अनोख्या कौशल्यामुळे तिची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. लोक ट्विटरवरही तिची माहिती शेअर करत आहेत. तसेच, एका युझरने व्हिडिओ शेअर करून तिला 'हॉर्स वूमन' असे नावही दिले आहे. कर्स्टनने सांगितले की, चार वर्षांची असताना तिला कुत्र्याप्रमाणे चालणे आवडायचे.


या सवयीचा काहीच त्रास नाही
कर्स्टनने तिचा अनुभवही शेअर केला आहे, ती म्हणाली की, "मला असे चालताना कधीच दुखापत झाली नाही किंवा माझ्या मनगटाला त्रास झाला नाही. लोकांना माझे हे वेगळे कौशल्य चांगलेच आवडत आहे." यादरम्यान एका युझरने तिच्या कौशल्याला सलाम केला आहे.

कर्स्टनने काही व्हिडिओ शेअर केले आहेत, यामध्ये ती एका कुत्र्यासोबत पळत आहे, तर दुसऱ्यामध्ये घोड्यासारखे वेगाने पळत आहे. ज्याप्रमाणे आयला जमीनीवर हात-पाय ठेवून पळत आहेत, कोणालाही याचा अंदाज लावता येत नाही की, हा मनुष्यच आहे का प्राणी.

X
COMMENT