आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष्टिक आहारयुक्त न्याहारीच देईल तुम्हाला दिवसभर ऊर्जा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही प्रवास करत असता तेव्हा तुम्हाला जास्त ऊर्जा आणि मजबूत प्रतिकार शक्तीची गरज असते. तुमची हीच गरज पाहता हॉटेल्समध्ये आता पाॅवर ब्रेकफास्ट सर्व्हे केला जात आहे. जाणून घेऊया यातील 5 गोष्टी व त्यातून मिळणारे लाभ.

1. फळे, उत्तम प्रतिकारशक्ती
मोसमी फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्सचे पुरेसे प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही रोज पपई खाऊ शकता. यात व्हिटॅमिन ए, सी आणि फॉलेट असते. यातील पपाइन पोटाचे विकार व मलावरोध दूर करण्यामध्ये सहायक असते. अशाच प्रकारे भरपूर लोह असलेले डाळिंब अॅनिमियापासून बचाव करते. फळांतील जीवनसत्त्वे व प्रथिने प्रोटीन शरीराला रोगप्रतिकार क्षमता प्रदान करतात.

2. ओट, पचनासाठी चांगले
ओटसोबत दूध शरीरासाठी अनेक प्रकारे फायद्याचे ठरते. यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन असतात. यात कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. सोबतच हाय फायबर असल्यामुळे यामुळेच तुमची पचनक्रिया चांगली राहते. वजन कमी करण्यासोबतच कोलेस्टेरॉल कमी करत हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यातही सहायक ठरते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ओट्स खाणे फायद्याचे आहे.

3. डिटॉक्स वाॅटर, वजन कमी होईल
शरीरातील विषाक्त पदार्थ दूर करण्यासाठी डिटॉक्स वाॅटर फायद्याचे ठरते. यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. सोबतच चेहरा स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठीही उपयुक्त आहे. फॅट फ्री असल्याने लोक हे पाणी पिणे पसंत करतात. घरच्या घरीच अनेक डिटॉक्स ड्रिंक बनवता येतात. जसे, आले-लिंबाचे पाणी. यासाठी आल्याचा रस लिंबू व पुदिन्याच्या रसात मिसळून दररोज सकाळी अनशापोटी सेवन करावे.

4. भिजवलेले बदाम, रक्तदाब
दररोज न्याहरीमध्ये किंवा उपाशी पोटी रात्रभर भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. यात व्हिटॅमिन ई, फायबर्स आणि फॉलिक अॅसिड असते. यामुळे पचनक्रिया सुधराण्यासोबतच फिगर मेंटेन करण्यात तुमची मदत होते. वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यामध्ये उपयुक्त असलेल्या बदामाचा पाॅवर ब्रेकफास्टमध्ये जरूर समावेश करा. ज्यांना रक्तदाब आहे, त्यांनी रोज भिजवलेले बदाम खावेत.


5. इडली,  स्नायू होतील ब
ळकट
एका मध्यम आकाराच्या इडलीमध्ये सुमारे ४० कॅलरी असते. यात कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट नसते. त्यामुळे इडली खाणे फायद्याचे आहे. तांदूळ आणि उडदाच्या डाळींपासून बनलेली इडली प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. हाडे आणि स्नायूंच्या बळकटीसाठी इडली फायद्याची मानली जाते. इडली लवकर पचते. याच्या सेवनाने थकवा येत नाही किंवा झोपेची समस्याही राहत नाही. तसेच याच्या सेवनाने अॅक्टिवनेस कायम राहतो.

बातम्या आणखी आहेत...