आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Pakistani Person Angry At Saif Ali Khan Said, 'He Has Killed Our So Many People In His Film...'

सैफ अली खानला पाहून चिडला एक पाकिस्तानी नागरिक, म्हणाला - 'याने त्याच्या चित्रपटात आपले खूपजण मारले आहेत' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार सैफ अली खान पोहोचला होता. त्याने आलिया फर्नीचरवाला आणि शिबानी डांडेकरसोबत मॅच पहिली. मॅचनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमध्ये ट्विटरवर सैफ अली खान टॉप ट्रेंडमध्ये असतो. एका पाकिस्तानी नागरिकाने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. सैफ, आलिया फर्नीचरवालासोबत मॅच पाहायला पोहोचला होता. तो स्टेडियममध्ये जातच होता तेवढ्यात एका पाकिस्तानी नागरिकाने त्याला घेरले आणि त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.  

 

 

सैफ अली खान जेव्हा स्टेडियमकडे जाऊ लागला तेव्हा एका पाकिस्तानी फॅनने येऊन सैफ अली खानला टीम इंडियाचा वॉटर बॉय म्हणू लागला. एवढेच नाही तर तो म्हणाला, 'याने चित्रपटात आपले खुपजण मारले आहेत....' सैफ अली खानला या फैनने ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. सैफ अली खानने या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले आणि मॅच पाहण्यासाठी स्टेडियमकडे चालल्या गेला. सैफ अली खानला 'एजंट विनोद' आणि 'फँटम' यांसारख्या चित्रपटात पाकिस्तानमध्ये जाऊन शत्रूला मारताना दाखवले गेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...