आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Person Reported Porn Advertisements On The Railway App, Then The IRCTC Said 'delete The History And ...'

एका व्यक्तीला रेल्वे अॅपवर दिसल्या अश्लील जाहिराती, तक्रार केली तर IRCTC ने सांगितले - 'हिस्ट्री डिलीट करा आणि...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : IRCTC सध्या चर्चेचा विषय बनलेले आहे. तिकीट बुकिंग वेबसाइट आयआरसीटीसी (IRCTC) वर एका यूजरने ट्वीट केले. त्याने सांगितले की, IRCTC अॅपवर तिकीट बुक करतांना अश्लील आणि आक्षेपार्ह जाहिराती परत परत दाखवल्या जात आहेत. IRCTC अॅप यूजर आनंद कुमारने IRCTC च्या ऑफीशियल अकाउंटवर ट्वीट करून रेल्वे मंत्री पियूष गोयलयांना टॅग केले आणि अश्लील अॅडचे स्क्रीनशॉट्स आणि अॅड दाखवल्या. यूजरने लिहिले, 'आयआरसीटीसी तिकीट बुकिंग अॅपवर अश्लील आणि आक्षेपार्ह जाहिराती अनेकवेळा दिसतात. हे खूप लाजिरवाणे आणि परेशान करणारे आहे.' आनंदने सोबतच आयआरसीटीसी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयलच्या ऑफिसलादेखील टॅग केले. आनंदने रेल्वे मंत्रालयाला या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचे सांगितले. 

 

 

त्यानंतर IRCTC कडून उत्तर आले, ट्विटरवर एका अधिकाऱ्याने लिहिले, 'आयआरसीटीसी जाहिरातींच्या सेवेसाठी गूगल जाहिरात सर्विंग टूल एडीएक्सचा उपयोग करते. या जाहिराती युजरला आकर्षित करण्यासाठी कुकीजचा उपयोग करतात. युजरचा इतिहास आणि ब्राउजिंग व्यवहाराच्या आधारावर जाहिराती दाखवल्या जातात. अशा जाहिरातींपासून वाचण्यासाठी ब्राउजर कुकीज आणि हिस्ट्री साफ करावी आणि हटवावी.' त्यानंतर आनंदचे हे ट्वीट खूप व्हायरल केले जात आहे. लोक आयआरसीटीसीचे खूप कौतुक करत आहेत आणि आनंद कुमारला खूप ट्रोल केले जात आहे. त्याच्या ट्वीटला 2.5 हजारपेक्षा जास्त लाइक्स आणि 800 पेक्षा जास्त रि-ट्वीट्स झाल्या आहेत.