life style / स्टडी रूममध्ये लावली पाहिजे देवी सरस्वती आणि गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती 

अभ्यासात मन लागत नाही तर वास्तु टिप्स ठरू शकतात उपयुक्त

दिव्य मराठी

Aug 18,2019 02:02:05 PM IST

जीवनमंत्र डेस्क : जर मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही आणि वाचलेले लक्षात राहत नसेल तर शक्यता आहे की, वास्तुमध्ये दोष असू शकतो. वास्तु दोषामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार वास्तु दोषांमुळे विचारातील नकारात्मकता वाढते आणि एकाग्रता कमी होते.

जाणून घ्या मुलांच्या स्टडी रूमशी निगडित काही वास्तु टिप्स...
- स्टडी रूम पश्चिम किंवा दक्षिण दिशेमध्ये शुभ असते. या रूमचा रंग फिकट हिरवा किंवा त्याच्याशी मिळत जुळत असेल तर छान, कारण हा रंग बुधचा रंग आहे आणि बुध हा शिक्षणाचा कारक ग्रह आहे.
- स्टडी रूममध्ये अभ्यासाचा टेबल कधीच कोपऱ्यात नसावा. टेबल नेहमी रूमच्या मध्ये भिंतींपासून थोडा दूर हवा.
- अभ्यास करताना मुलाचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवे. यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढते.
- स्टडी रूममध्ये देवी सरस्वती आणि श्रीगणेशाचा फोटो असेल तर चांगलेच. यामुळे शुभ फळे मिळतात.
- टेबलवर पिरॅमिडदेखील ठेऊ शकतो. यामुळे पिरॅमिडच्या शुभ प्रभावाने स्टडी रूममध्ये ऊर्जा वाढते.
- लक्षात असू द्या स्टडी रूममध्ये पुस्तके कधीच इकडे तिकडे पसरलेली नसावी.
- मुलांनी रोज सकाळी लवकर उठले पाहिजे आणि काही वेळ मेडिटेशन केले पाहिजे. यामुळे एकाग्रता वाढते. मेडिटेशन केल्यामुळे मुलांचा राग कमी होतो आणि त्यांचे मन शांत राहाते आणि अभ्यास योग्यपणे करू शकते.

X