Home | National | Delhi | a picture of Wing Commander Abhinandan Varthaman voting for the BJP

विंग कमांडर अभिनंदन यांनी दिला भाजपला पाठींबा, मोदींनी म्हणाला बेस्ट पीएम, या मेसेजसोबत व्हायरल होत आहे त्यांचा फोटो...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 12:50 PM IST

या फोटोमुळे होत आहे खूप कन्फ्यूजन, शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या सत्य

  • a picture of Wing Commander Abhinandan Varthaman voting for the BJP

    नॅशनल डेस्क-मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, यात सांगितले जात आहे की विंग कमांडर अभिनंदन यांनी भाजपला जाहीर पाठींबा दर्शवला आहे. त्यांनी भाजपच्या कामाचे कौतुक करत काँग्रेसला बिनकामाचे सरकार संबोधले आहे. सोशल मीडियावर लोक याला खूप शेअर करत आहेत. पण जाणून घ्या काय आहे या व्हायरल मेसेजमागचे सत्य.


    काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
    - सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो पोस्ट केला गेला. त्यासोबतच एक मेसेज होता- ''विंग कमांडर अभिनंदन यांनी जाहीररित्या भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच मोदींचे कोतुकर करत काँग्रेसला बिनकामाचे सरकार असे संबोधले आहे.''


    - या मेसेजसोबत विंग कमांडर यांचा फोटो आहे, त्यासोबतच त्यांच्या गळ्यात भगवा गमछा आहे. त्यांनी टोपी घातली आहे आणि चष्मा घातला आहे. कोणीही या फोटोला खरा माणेल, पण हा खोटा फोटो आहे. कोणीतरी एडीटींग करून हा फोटो बनवला आहे.

Trending