आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Piece Of Cake Took Like Of A 11 Year Old Boy, Now Family Is Warning Others Not To Commit Same Mistake

केक खाल्ल्याने झाला मुलाचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चकीत करणारा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा. फ्लोरिडाच्या मेनेमध्ये राहणा-या एका मुलाचा केक खाल्ल्यामुळे मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जो खुलासा झाला, ते पाहून कुटूंबातील लोक चकीत झाले. आता हे पालक दूस-या मुलांच्या पालकांना सावध करतात. खरेतर, येथे राहणारा 11 वर्षांचा ओकले डेब्स आपल्या कुटूंबातील एका पार्टीमध्ये सहभागी झाला होता. येथेच त्याने केकचा एक पीस खाल्ला आणि चार दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. 


या केकमध्ये काय होते 
- केक खाल्ल्यानंतर ओकलेच्या शरीरावर खुप खाज येते. त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. घरच्यांना कळते की, त्याला अॅलर्जी झाली आहे आणि त्याला अँटी अॅलर्जिक सिरप देऊन झोपवतात.
- ओकलेची आई म्हणते की, त्याला यापुर्वी अनेक वेळा अशी अॅलर्जी झाली आहे. तेव्हाही आम्ही त्याला औषध द्यायचो आणि त्याचा परिणामही व्हायचा. परंतु त्या रात्री असे झाले नाही, ओकलेची तब्येत बिघडली.
- ओकलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येते, परंतु त्याची तब्येत सुधारत नाही. दोन दिवसांनंतर त्याचा मृत्यू होतो. 


पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चकीत करणारे खुलासे 
- 11 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने डेब्स कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या मुलाला असे काय झाले की, त्याचा अचानक मृत्यू झाला, हे त्यांना कळत नाही. तेव्हाच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चकीत करणारा खुलासा होतो. ओकलेचा मृत्यू एका अॅलर्जिक रिअॅक्शनमुळे होतो असे यामध्ये समोर येते. ही अॅलर्जिक रिअॅक्शन पीनट किंवा भुईमुगाने होते. 
- डॉक्टरांनी सांगितले की, ओकलेला पीनटची अॅलर्जी होती. त्याने पार्टीमध्ये जो केक खाल्ला त्यामध्ये पीनट मोठ्या प्रमाणात होते. यामुळेच त्याला ही रिअॅक्शन झाली आणि त्याच्या इम्यून सिस्टमवर परिणाम झाला. 

 

आता लोकांना सावध करत आहे कुटूंब 
- आपल्या मुलाला एवढ्या कमी वयात गमावल्यानंतर डेब्स कुटूंबाने एक मिशन सुरु केले आहे. डेब्स कुटूंब आता अॅलर्जिक रिअॅक्शन आणि खाण्यापिण्याविषयी लोकांना जागृत करत आहेत. या कुटूंबाने अनेक कँप्स आणि ऑनलाइन पोस्ट्सच्या माध्यमातून इतर पाकलांना जागृक करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही मुलाचे असे नकळतपणे प्राण जाऊ नये असे त्यांना वाटते.
 

बातम्या आणखी आहेत...