Home | International | Other Country | a powerful blast struck kabul’s main military hospital on saturday

काबुलमध्ये स्फोटात तीन जण ठार

Agency | Update - May 21, 2011, 03:58 PM IST

काबुलमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात तीन जण ठार झाले.

  • a powerful blast struck kabul’s main military hospital on saturday

    काबुल - शहरातील मुख्य लष्करी रुग्णालयाजवळ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात तीन जण ठार आणि अनेक जण जखमी झाल्याचे, संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

    प्रवक्ते जनरल मोहम्मद झहेर आझीमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्य भागात असलेल्या मोहम्मद दौड खान या लष्करी रुग्णालयाजवळ हा स्फोट झाला. हा हल्ला आत्मघाती हल्ला असून, रुग्णालयाच्या मैदानावरही एक बॉम्ब सापडला आहे. या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची संख्या जास्त असून, यांचा या स्फोटातील मृतांमध्ये समावेश आहे.

Trending