Misbehave / शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेस डॉक्टरकडून मारहाण

संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

दिव्य मराठी

May 11,2019 10:04:00 AM IST

जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरने प्रसूतीसाठी आलेल्या महिला रुग्णांना अर्वाच्य भाषेत बोलून दमदाटी केली. तसेच गर्भवती महिलेला चापट मारल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.


वरणगाव येथील गायत्री राजेश कोळी (२१) शुक्रवारी सकाळी डॉ. स्वाती बाजेड यांच्याकडे तपासणीसाठी गेल्या असताना त्यांनी संताप व्यक्त करत चापट मारली. त्यामुळे कोळी या रडत कक्षाबाहेर आल्या. यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्याचबरोबर प्रसूतीसाठी आलेल्या वैशाली संदीप सपकाळे (रा. महुखेडा, ता. जामनेर) या महिलेलाही डॉक्टरांनी हाकलल्याचे त्यांच्या सासूने सांगितले. दरम्यान, वॉर्ड क्रमांक ६ मध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांनीही डॉक्टरांनी कोळी यांना चापट मारल्याचे सांगितले. याप्रकरणी अद्याप तक्रार दाखल नव्हती.

X