आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारूरच्या घाटात औरंगाबादकडे जाणारी खासगी बस कलंडली ; १ ठार, १५ जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर - येथून गेलेला खामगाव-पंढरपूर हा राज्य महामार्ग रुंदीकरणासह पूर्ण झाला आहे. परंतु ऐन धारूरच्या घाटात अकरा किमी रस्ता हा अरुंद ठेवल्याने येथील घाटात कायमच अपघात होत असतात. सोमवारी पहाटे याच अरुंद घाटामध्ये उदगीरहून औरंगाबादकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स पलटी झाली. यात एक महिला ठार, तर पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.


खामगाव-पंढरपूर हा राज्य महामार्ग रुंदीकरण आणि सुशोभीकरणासह जवळपास पूर्णत्वास गेला आहे. परंतु येथील अवघड वळणाच्या घाटामध्ये अकरा किमीचा रस्ता हा अरुंद करण्यात आल्याने या अरुंद घाट रस्त्यावर कायमच अपघात होत असतात. मागील दीड ते दोन महिन्यांमध्ये या ठिकाणी डझनभरपेक्षा जास्त अपघात झाल्याची नोंद झालेली असेल. सोमवारी पहाटे औरंगाबादच्या दिशेला जाणारी ट्रॅव्हल्स (एमएच २० डब्ल्यू  ९९०६) ही गाडी पलटी झाल्याने गाडीमध्ये असलेल्या ३६ प्रवाशांपैकी या अपघातात साठ वर्षीय ज्योती नावाच्या महिलेस गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला, तर सचिन काटे, संदीप काटे, सूर्यकांत धोमाणे, बालाजी घुले, बालाजी अनंत, दीपा कदम, वर्षा कांबळे, समर्थ कदम, विलास पाटील, गणपत राठोड, चंद्रकांत कांबळे, मुरलीधर शिरोळे, जयश्री शिरोळे हे जखमी झाले. त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले .

 

माळापुरीजवळ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जखमी 
दरम्यान,  दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना माळापुरी (ता. बीड) जवळ रविवारी मध्यरात्री घडली. माळापुरीकडे जाणारी दुचाकी व समोरून येणारी दुचाकी यांची रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात अमोल अशोक सूर्यवंशी व छगन अशोक सूर्यवंशी हे दोघे जखमी झाले. दरम्यान, अपघातात दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...