आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ व्या वर्षी रोज आत्महत्येचा विचार करत होता रहमान, चित्रपट संगीत आवडत नव्हते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अलीकडेच संगीतकार ए. आर. रहमानचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. हे त्याचे अधिकृत आत्मचरित्र. ते कृष्णा त्रिलोक यांनी लिहिले आहे. ते रहमानला चित्रपट संगीतात संधी देणाऱ्या त्रिलोक नायक यांचे पुत्र आहेत. पुस्तकात रहमानचे अनेक अपरिचित पैलू समोर आले आहेत. त्यांची चर्चा ते कमीच करतात. ए.आर. रहमानशी संबंधित ऐकिवात नसलेल्या १० गोष्टी. 

 
> रहमानला कधीही चित्रपट संगीत देण्याची इच्छा नव्हती. बँड आणि गैर-फिल्मी संगीतापर्यंतच मर्यादित राहण्याची त्याची इच्छा होती. पण त्याला चित्रपट संगीत निवडावे लागले. वयाच्या ११ व्या वर्षी तो मल्याळम संगीतात इन्स्ट्रुमेंटलिस्ट म्हणून प्रस्थापित झाला होता. 
> वयाच्या २५ व्या वर्षी रहमान स्वत:ला खूप अपयशी मानत होता आणि रोज आत्महत्येचा विचार करत होता. 
> रहमानच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरखर्च भागवण्यासाठी त्याची आई त्याच्या वडिलांची वाद्ये भाड्याने देत होती. ही जगभरातील वाद्ये फक्त रहमानलाच वाजवता येत होती. त्यामुळे तो वाद्यांसोबत जात असे. 
> रहमानचे लग्न अॅरेंज पद्धतीचे आहे. पहिल्या भेटीतच त्याने पत्नी सायरा बानूला म्हटले होते की, 'जर आपण जेवण करत असू आणि मला कुठली चाल सुचली तर आपल्याला जेवण सोडावे लागेल.' त्याबाबत त्याची पत्नी म्हणते की, रहमानने लग्नाआधीच 'ऑटो-ट्यून' केले होते. 
> रहमानला आपल्या जन्माच्या वेळचे 'दिलीपकुमार' हे नाव आवडत नाही, कारण त्यामुळे त्याला अडचणीच्या काळाची आठवण येते. त्याला आपल्या जुन्या नावावर किती आक्षेप आहे हे एका गोष्टीवरूनही कळते, ती म्हणजे पुस्तकात त्याचे दिलीपकुमार हे नाव एकदाच लिहिले जावे, असे त्याने प्रकाशकाला बजावले होते. पूर्ण पुस्तकात रहमान किंवा एआर हेच नाव वापरले आहे. 
> रहमानने आपला 'पंचतान रेकॉर्ड इन' हा पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ आपल्या घराच्या अंगणातच तयार केला होता. याच स्टुडिओने त्याचे आयुष्य बदलले. आताही तो जेव्हा चेन्नईत असतो तेव्हा बहुतेकदा याच स्टुडिओत रेकार्डिंग करतो. त्याच्या सहकाऱ्यांनुसार, रहमानचे सर्वाधिक रचनात्मक काम येथेच समोर येते. 
> ऑस्कर समारंभात परिधान करण्यासाठी रहमानला विशेष ड्रेस देण्याची दिग्दर्शक मणिरत्नम यांची इच्छा होती. पण रहमानच्या पत्नीने प्रख्यात फॅशन डिझायनर सव्यसाचीकडून काळी शेरवानी तयार करून घेतली होती.

> संगीतात परफेक्शन आणण्यासाठी रहमान कुठलाही अल्बम प्रकाशित होण्याच्या वीस आधीपर्यंत त्याच्या गाण्यात बुडालेला असतो. तो प्रत्येक गाणे अनेकदा ऐकतो. त्या काळात तो दिवसा फक्त एक तास झोपतो. 
> पुस्तकात रहमानचे विनोदी किस्सेही आहेत. एका गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या वेळी दिग्दर्शक इम्तियाज अलीने, 'गायक मोहित चौहानला कॉफी देऊ का?' असे विचारले. रहमानने नकार देत म्हटले, 'नाही, त्याला वेदना द्या. वेदनेमुळेच तो चांगला संगीतकार होईल.' 
> सध्या रहमान चित्रपटांसाठी खूप वेळ देत आहे. तो '९९ साँग्ज' नावाचा हिंदी संगीतप्रधान चित्रपट तयार करत आहे. त्याने 'मस्क' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. 'ले मस्क' व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारित लघुपट आहे. तो ५ डीत रिलीज होईल. या नव्या वेडाबाबत रहमान म्हणतो की, मी खूप लवकर बोअर होतो त्यामुळे मी चित्रपट निर्मितीत आलो. 

 

बातम्या आणखी आहेत...