आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पैठण शाखेच्या वतीने प्रथमच यंदा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पैठण शहरात भव्य ३७० फुटांची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या तिरंगा पदयात्रेची सुरुवात माहेश्वरी आश्रमापासून करण्यात आली. आजच्या कार्यक्रमात ११ गटांमध्ये १४ गट प्रमुख व ४५ कार्यकर्त्यांनी काम केले.
देश विरोधी कृत्य करणाऱ्यांचा निषेध
प्रवीण घुगे यांनी मुख्य विषयाची मांडणी करताना विद्यार्थी परिषदेत काम करत असताना देश विरोधी कृत्य करणाऱ्यांचा निषेध करून राष्ट्राच्या हितासाठी करत आले असल्याचे सांगितले. आज मात्र काही लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी देशात जातीय रंग देऊन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यांचा होता पदयात्रेत सहभाग
महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, शुभम खरात, धनंजय सोनवणे,आकाश हराळे, ईश्वर कांबळे तसेच भाजप शहराध्यक्ष विजय चाटुपळे, सतीश आहेर, महेश जोशी, राजेंद्र गोर्डे, नाना लखमले, अतिश बारे, नीलेश परदेशी अादी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मता वाढली पाहिजे
सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता वाढली पाहिजे या उद्देशाने शहरातून ही ३७० फूट लांब तिरंगा यात्रा काढण्यात आली असल्याचे आर्य चाणक्य विद्यामंदिरचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना आपल्या तिरंगा विषय प्रेम असते, या यात्रेच्या माध्यमातून त्यात एकात्मतेची भर पडते, असे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.