आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सचखंड’ गाडीला आग लागल्याची अफवा; अर्धातास गाडी बदनापूर स्टेशनवर उभी, तपासणीनंतर नांदेडला रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर - अमृतसरहून नांदेडला जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेस रेल्वेगाडीत आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशाांमध्ये एकाच खळबळ माजली.  ही गाडी बदनापूर रेल्वे स्टेशनजवळ  थांबून दक्षता पथकाने तपासणी केली असता कुठेच आग लागली नसल्याचे स्पष्ट झाल्याने  प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला व गाडी पुढे गेली. ही घटना गुरुवारी दुपारी १२.५० मिनिटाला घडली. यामुळे तब्बल अर्धा तास गाडी बदनापूर स्टेशन परिसरात थांबून होती.


अमृतसर ते नांदेड जाणारी सचखंड एक्स्प्रेस औरंगाबादहून १२ वाजून १० मिनिटाला निघाली. दरम्यान बदनापूरजवळ १२ वाजून ४० मिनिटांना पोहाेचली असता या गाडीत आग लागल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे प्रवाशी भयभीत झाले, आरडाओरड करू लागले. ही बाब गाडीत असलेल्या गार्डच्या लक्षात येताच गाडी बदनापूर स्टेशनजवळ १२ वाजून ५० मिनिटाला थांबवण्यात आली. प्रवाशी खाली उतरू लागले. गार्डने तात्काळ गाडीची तपासणी केली असता कुठेच आग लागली नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रवाशांच्या जिवात जीव आला व ते गाडीत बसले. आग लागल्याची अफवा पसरल्याने गाडी तब्बल अर्धा तास बदनापूर रेल्वे स्टेशन परिसरात थांबलेली होती. शेवटी एक्स्प्रेसमध्ये अाग लागल्याची अफवा असल्याचे निष्पन्न झाल्याने ती पुढे निघाली व जालना स्टेशनवर १ वाजून ४० मिनिटांना पोहाेचली. या संदर्भात बदनापूर रेल्वे स्टेशनशी  संपर्क साधला असता कोणी तरी आगीची अफवा पसरवल्याने गाडी थांबवली होती. मात्र गार्डने तपासणी केल्यानंतर गाडी सोडण्यात आली, अशी माहिती संबंधितांनी दिली.