Sport / Live सामना सुरू असताना तोकड्या कपड्यांमध्ये मैदानावर अवतरली तरुणी, रातो-रात बनली सोशल मीडिया सेन्सेशन

युरोपियन चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात घडला प्रकार 
 

दिव्य मराठी वेब

Jun 02,2019 06:42:00 PM IST

माद्रिद - सामना सुरू असताना चाहत्याने आपल्या लाडक्या खेळाडूला भेटण्यासाठी सुरक्षा भेदल्याचे आपण पाहत आलो आहोत. पण एखाद्या तरुणीने अत्यंत कमी कपड्यात सुरक्षा भेदल्याचे सहसा ऐकले नाही. शनिवारी असाच काहीसा प्रकार युरोपियन चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पाहण्यास मिळाला आणि ती तरुणी जगभरात फेमस झाली. तिचे इंन्स्टाग्रामवर एका रात्रीत 1.6 मिलियन फॉलोवर वाढले.

शनिवारी मध्यरात्री युरोपियन चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना पार पडला. टोदनहॅम आणि लिव्हरपूल या दोन संघांत हा सामना सुरू होता. सामना सुरू असताना एक तरुणी मैदानावर आली. ती मैदानावर कधी आणि कशी आली हे सुरक्षकांना देखील समजले नाही. काळ्या रंगाचा वन पीस घातलेल्या या तरुणीने सामन्यात बराच वेळ व्यत्यय आणला. मग सुरक्षकांनी तिची समजून काढून तिला मैदानाबाहेर काढले.

लिव्हरपूलने टोदनहॅमचा 2-0 ने पराभव करत चषकावर आपले नाव कोरले. मोहम्मद सलाह आमि डी ओरिजी यांनी प्रत्येकी एक गोल केला.


X
COMMENT