आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग पतीकडून घटस्फोट मिळावा म्हणून रचला स्वत:च्या गँगरेपचा कट, म्हणाली- काहीही झाले तरी सासरी जाणार नाही..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझमगड (उत्तर प्रदेश) - गौनाच्या (बिदाई) काही दिवसांपूर्वी एका महिला शिक्षिकेने अशी कथा रचली की, त्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर तर कोसळलाच; पण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. रस्त्यावरून किडनॅप करून तिच्यावर चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करत युवतीने खळबळ उडवली होती. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण हे प्रकरण साफ खोटे असल्याचे उघडकीस आले. खरंतर महिलेला आपल्या दिव्यांग नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायचा होता. त्यामुळे तिने हा कट रचला होती. तिने केलेल्या या कृत्याचा तिला पश्चात्ताप नाहिये. उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणाबाबत युवतीच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातला होता. त्यांनी पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केला होता. 

 

> एपी नगर येथील कमलेश बहादून यांनी सांगितले की, या युवतीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली होती. महिलेला 4 लोकांनी रस्त्यावरून उचलून नेले आणि सामूहिक बलात्कारानंतर तिला रस्त्यावर फेकून देण्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. 

 

>  हे प्रकरण खोटे असल्याचे पोलिस तपासात समोर आले. युवतीला स्वत:चे नाव खराब करून घटस्फोट घ्यायचा होता. 12 डिसेंबर रोजी महिलेचा गौना (बिदाई) होणार होता; पण तिला कोणत्याही परिस्थितीत सासरी जायचे नव्हते. तिला इतर कोणता मार्ग सुचत नसल्यामुळे तिने सामूहिक बलात्काराची कहाणी रचली. पण तिने केलेल्या या कृत्याचा काहीही पश्चात्ताप होत नाहीये. उलट दिव्यांग नवऱ्यापासून सुटका मिळाल्यामुळे ती आनंदी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...