Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | A seven-year imprisonment for mother and child for carrying Drug

अमली पदार्थ बाळगणारी आई, मुलाला सात वर्षांचा कारावास

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 12:51 PM IST

आष्टी तालुक्यातील शिरकुटणी बसस्थानक परिसरात आई व मुलगा हे दोघे जण अमली पदार्थ घेवून विक्री करत असल्या प्रकरणी

  • A seven-year imprisonment for mother and child for carrying Drug

    वर्धा- आष्टी तालुक्यातील शिरकुटणी बसस्थानक परिसरात आई व मुलगा हे दोघे जण अमली पदार्थ घेवून विक्री करत असल्या प्रकरणी न्यायालयाने दोघांना सात वर्षे सक्त मजुरी शिक्षेसह प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रेहबानी शेख अतिक वय ४० व शेख सोहेल अतिक वय २५ अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे मायलेक २५ जानेवारी २०१५ रोजी (गांजा) अमली पदार्थांची विक्री करताना आढळले.


    आर्वी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सापळा रचून दोघांजवळून ८ किलो ५०९ ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कलम २० ब एन डी पीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली. प्रकरणाचा तपास पूर्ण करीत प्रकरण न्याय प्रविष्ट करीत न्यायालयात सादर केले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता जी व्ही तकवाले यांनी १२ साक्षीदार तपासले.सरकारी सहाय्यक अभियोक्ता विनय घुडे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही आरोपीस सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा व वीस हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास साध्या तीस दिवसांची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी ठोठावण्यात आली.

Trending