आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा म्हणाला - तुझ्यावर भूत-प्रेताची छाया आहे, हे ऐकताच मुलगी घाबरली; यानंतर तो तिला दररोज खोलीत घेऊन जात होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खन्ना (पंजाब) -  येथे भूत-प्रेताचे भय दाखवत एक युवतीसोबत अनेक दिवस बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. गौरव भगत असे आरोपीचे नाव असून तो माता राणी भागात राहत होता. याठिकाणीच तो आपला दरबार भरवत असे. 17 मार्च रोजी मुलीचे कुटुंबीय ढोंगी बाबाकडे गेले. मुलगी मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. बाबाने मुलीच्या अंगात भूत-प्रेत असल्याचे सांगितले. यानंतर मुलगी आणि कुटुंबीय घाबरले. आरोपीने 20 मार्च रोजी पुन्हा मुलीला बोलावले. 21 मार्च रोजी आरोपीने सर्वांना खाली सोडले आणि मुलीला घेऊन आश्रमातील वरील खोलीत गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ढोंगी बाबाने लगातार तीन दिवस 22,23 आणि 24 मार्च रोजी मुलीला एकट्याने खोलीत घेऊन गेला होता असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.  

बातम्या आणखी आहेत...