आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Short Circuit Fire In The Premises Of The Prime Minister's Residence, The PMO Tweeted, Said Everyone Was Safe

पंतप्रधान निवास परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, पीएमओने ट्वीट करत सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली-  पंतप्रधान निवासातील 9, लोक कल्याण मार्गावर आज संध्याकाळी 7 वाजून 25 मिनीटांनी आग लागल्याची घटना घडली. हा एसपीजीचा रिसेप्शन एरिया आहे.

वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्मिशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्र मिळवले. पीएमओने ट्वीट करुन सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. दरम्यान, ज्या परिसरात आग लागली तिथे पंतप्रधानांचे कार्यलय नाही. हा एलकेएम कॉम्पलेक्समधील एसपीजीचा रिसेप्शन एरिया आहे.

नववर्षाच्या पुर्वसंधेला दिल्ली अग्निशमन विभाग सज्ज

नववर्षाच्या पुर्वसंधेला दिल्लीत जागोजागी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्या आले आहे. त्याठिकाणी काही अपघात होऊ नये यामुळे दिल्लीतील कॅनॉट प्लेससह इथर 10 ठिकाणी अग्निशमन दलाच्या 1300 गाड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी दिल्लीतील नागरिकांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीतील साउथ एक्सटेंशन बाजार, गांधी नगर, राजौरी गार्डन, रानी बाग, छतरपूर, खान मार्केट, रोशन क्लब, पंचशील एन्क्लेव, वसंत विहारसारक्या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे या प्रत्येक परिसरात एक-एक गाडी तैनात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...