आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात मुलगी ठेवून सहा दिवसांचा मुलगा चोरला; स्वारातीतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातून सहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या व मुलगा असलेल्या बाळाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्याच वेळी दुसऱ्या वॉर्डात एक महिला नवजात मुलगी (अर्भक) ठेवून पसार झाल्याने मुलाच्या लालसेतून त्या महिलेनेच बाळ चोरून नेले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. धारूर येथील हॉटेलचालक सैफ शेख यांची पत्नी सफिना प्रसूतीसाठी स्वाराती रुग्णालयात दाखल झाली होती. बुधवारी सायंकाळी तिने मुलास जन्म दिला. त्यानंतर त्यांच्यावर वॉर्ड क्र. ६ मध्ये उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी १२च्या सुमारास सफिना यांना झोप लागली. दुपारी १ वाजता जाग आली तेव्हा बाळ जवळ नव्हते. बाळाचा सर्वत्र शोध सुरू झाला. दरम्यान, एक महिला वॉर्ड क्र. ८ मध्ये स्वत:कडील अर्भक (मुलगी) एका महिलेच्या जवळ ठेवून पसार झाली. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.