आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्सिलमुळे सहा वर्षांच्या बालकावर दाखल झाला गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नदबई (भरतपूर) - भरतपूरच्या नदबई गावात गेल्या महिन्यात विचित्र घटना समोर आली. दुसऱ्या इयत्तेत शिकणारा एक मुलगा पेन्सिलला टोक करत असताना पेन्सिल हातातून उडाली आणि दुसऱ्या मुलाच्या डोळ्यात घुसली. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यावर पालक त्याला दवाखान्यात घेऊन गेले. अनेक दिवस उपचार करूनही डोळा बरा न झाल्याने सहा वर्षांच्या मुलावर षड्यंत्र करत डोळा फोडल्याचा आरोप लावण्यात आला. एवढेच नाही, तर त्याच्याविरोधात १७ दिवसांनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी मुलाच्या पित्याने दाखल केलेल्या एफआयआरनुसार त्यांचा मुलगा नदबईतील केव्हीएम विद्यालयातील होली हाइट इंग्लिश मीडियममध्ये दुसऱ्या  वर्गात शिकतो. गेल्या २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता वर्गात शिक्षिका गणित शिकवत होती. तेव्हा विद्यार्थी दुसरा विद्यार्थी पेन्सिलला टोक करत होता.
 
त्या वेळी त्याने पेन्सिल वर्गमित्राच्या डोळ्यात घातली. यामुळे तो जखमी झाला. पित्याचा आरोप आहे की, शाळा व्यवस्थापनाने जखमी मुलास ना घरी पाठवले ना त्याच्यावर उपचार केले. शाळा सुटल्यानंतर तो घरी आल्यानंतर घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन भरतपूर घेऊन गेले. नंतर जयपूरला नेण्यात आले. तेथेही फायदा न झाल्याने त्याला नवी दिल्लीतील एम्समध्ये आणण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. पोलिस उपनिरीक्षक पंजाब सिंह यांनी सांगितले की, ज्या मुलावर वडिलांच्या मदतीने डोळा फोडण्याचा आरोप आहे त्याचे वय ६ वर्षे आहे, तो दुसरीत शिकतो. यात कट करण्यासारखे काही दिसत नाही. आता, कुटुंबीयांना या प्रकरणात कोणतीही कारवाई नको आहे. मात्र, त्यांनी लेखी स्वरूपात काही दिलेले नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...