Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | A six-year-old girl filed a complaint against the accused

सहावर्षीय मुलीचा विनयभंग आरोपीविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 07:57 AM IST

पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

  • A six-year-old girl filed a complaint against the accused

    परभणी - शहरातील मेहराजनगर भागात किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपी विरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.


    पीडित मुलीच्या वडिलाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सदर मुलगी ही तिच्या अत्याकडे गेली होती. ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान सदर मुलगी सेवक नगरातील किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेली असता याच भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय इसमाने सदर मुलीला घरी नेले. तिचे दोन्ही हात दोरीने बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने सर्व हकीकत पालकांना सांगितली. त्यानंतर सदर इसमाचा शोध घेण्यात आला. आरोपीला मुलीने ओळखले. आरोपी विरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि बाबासाहेब वैजनाथराव करीत आहेत.

Trending