आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण काेरियाच्या सहा वर्षीय यूट्यूब स्टार मुलीने सेऊलमध्ये 55 काेटींची मालमत्ता खरेदी केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - दक्षिण काेरियाची सहा वर्षीय बाेरमने आपल्या दाेन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ५५ काेटी रुपयांची कमाई केली आहे. या पैशातून या चिमुरडीने सेऊलमध्ये पाच मजली इमारतीची खरेदी केली. ही इमारत २५८ चाैरस मीटर आहे. त्याचा वापर बाेरमच्या कुटुंबाची कंपनी करू लागली आहे. 


बाेरमच्या चॅनेलला सुमारे ३ काेटींहून जास्त सबस्क्रायबर आहेत. पहिल्या चॅनेलचे नाव टाॅय रिव्ह्यू आहे. त्यास १.३६ काेटी सबस्क्रायबर आहेत. दुसरे चॅनेल व्हिडिआे ब्लाॅगचे आहे. त्यास १.७६ काेटी सबस्क्रायबर आहेत. त्यात बाेरम परिवाराचे दैनंदिन जीवनाचे व्हिडिआे अपलाेड करण्यात आले आहेत. बाेरमचे यू-ट्यूब चॅनल दक्षिण काेरियात सर्वाधिक लाेकप्रिय आहेत. संयुक्त रूपाने देशातील सर्वात जास्त कमाई करणारे हे यू-ट्यूब चॅनेलही आहेत. संपूर्ण जीवनात मी एवढी कमाई करू शकत नाही, बाेरमने वर्षभरात यू-ट्यूबने तेवढी कमाई केली आहे. 


सर्वात जास्त चर्चेतील क्लिप, ३७.६ काेटी लाेकांनी पाहिली
एका क्लिपमध्ये बोरम प्लास्टिक टाॅय किचनमध्ये घाईगडबडीने नूडल्स खाताना दिसून येते. अचानक हे नूडल्स ती कॅमेऱ्यावर सांडते. ही क्लिप ३७.६ काेटी लाेकांनी पाहिली. 


काही क्लिप वादग्रस्त : २०१७ मध्ये पाेस्ट करण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये बाेरम वडिलांच्या खिशातील पाकिटातून पैसे चाेरताना दिसते. त्यानंतर स्वत: कार चालवण्याचा प्रयत्न करते. याप्रकरणी काैटुंबिक न्यायालयाने बाेरमच्या आई-वडिलांना पाचारण केले. बाेरमचे समुपदेशन करण्याचा आदेशही दिला. 


अमेरिकेची ७ वर्षीय रियान काजी पहिल्या क्रमांकावर, वर्षभरात १५२ काेटी कमाई
फाेर्ब्जच्या मते, गेल्या वर्षी अमेरिकेच्या सातवर्षीय रियान काजीने यू-ट्यूबच्या माध्यमातून १५२ काेटी रुपयांची कमाई केली हाेती. यू-ट्यूबद्वारे एखाद्या मुलाने सर्वाधिक कमाई करण्याची ही पहिलीच वेळ हाेती. रियानचेही टाॅय रिव्ह्यू चॅनेल आहे. या चॅनेलला २.०८ काेटी सबस्क्रायबर आहेत. अमेरिकेच्याच पाचवर्षीय टायडसच्या यू-ट्यूब चॅनेलला सुमारे ३१ लाख सबस्क्रायबर आहेत. 

बातम्या आणखी आहेत...