आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॉर्थलर्टन - इंग्लंडमध्ये एखा कुटुंबातील काही तरुण मुले आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या जुन्या घराची स्वच्छता करत होती. त्याचवेळी त्या सर्वांना घरात एका लहान मुलाची डेड बॉडी ठेवलेली आढळल्याने सर्वांना धक्का बसला. ही डेडबॉडी ममी सारखी लेप लावून ठेवलेली होती. नंतर त्यांना समजले की, ती डेडबॉडी त्यांच्याच एका भावाची होती. ज्याबाबत त्यांना कधीही सांगण्यात आलेले नव्हते. अगदी त्या मुलाच्या वडिलांनाही या मुलाबाबत काहीही माहिती नव्हते.
पायऱ्यांखाली आढळला बॉक्स
- मुलांना घरात पायळ्यांच्या खाली हा जवळपास दीड फुटाचा बॉक्स आढळला.
- त्यांनी बॉक्स उघडला तेव्हा त्यात एक नवजात अर्भकाचा मृतदेह कापडात लपेटून ठेवलेला होता. ममीप्रमाणे हा मृतदेह ठेवलेला होता. त्याशिवाय त्यात काही लिफाफेही ठेवलेले होते.
- मुलांना याबाबत काही माहिती नसल्याने ते आधी पोलिसांकडे गेले.
- पोलिसांनी सर्वात आधी कुटुंबीयांची चौकशी केली. पम सर्वांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या नवजात बाळाच्या डेडबॉडीचे पोस्टमॉर्टम आणि DNA टेस्ट केली.
- DNA टेस्टमध्ये ते बाळ त्यांची आई म्हणजे कॅरोलचेच असल्याचे समोर आले. म्हणजे या तीन भावंडांचा तो भाऊ होता. ज्या कापडात ते बाळ आढळले ते 60 वर्षे जुने असल्याचे समजले. बॉक्समधील लिफाफ्यावर आणि लेटर्समध्ये ऑगस्ट 1968 ची तारीख लिहिलेली होती.
अधिकारी म्हणाले अशी केस पाहिली नाही
- कॅरोलचा पती मेल्विन म्हणाला की, या बॉक्सबाबत त्याला माहिती नव्हते आणि तो या बाळाचा पिताही नाही.
- कॅरोल आणि मेल्विनचे लग्न 1968 मध्ये आणि घटस्फोट 1996 मध्ये झाला होता. त्याचवर्षी कॅरोलचा मृत्यूही झाला.
- कॅरोलच्या तिन्ही मुलांचा जन्म 1968 नंतर झाला होता. त्यापैकी कोणालाही त्यांच्या या भावाबाबत माहिती नव्हती. कारण ते बाळ 1968 पूर्वी जन्मलेले होते. म्हणजेच कॅरोल लग्नाआधी एकदा आई बनलेली होती. पण तिने आयुष्यभर याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही.
- पोलिस म्हणाले की, अशी केस त्यांनी कधीही पाहिली नाही. बाळ पूर्ण 9 महिन्यांनी जन्मले होते. पण त्याचा मृत्यू कसा झाला हे शोधणे कठीण आहे, असेही पोलिस म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.